मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ (Maharashtra Political Crisis) घेतली आहे. शपथ (NCP Political Crisis) घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, वळसे पाटील यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. अजित पवारांच्या बंडखोरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे प्रेरणास्थान (Supriya Sule on Ajit Pawar NCP Rebel) हे फक्त शरद पवारच असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
-
Inspiration ⏰⏰😍✌️💪 pic.twitter.com/sgOHvGvM6f
— Supriya Sule (@supriya_sule) July 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Inspiration ⏰⏰😍✌️💪 pic.twitter.com/sgOHvGvM6f
— Supriya Sule (@supriya_sule) July 2, 2023Inspiration ⏰⏰😍✌️💪 pic.twitter.com/sgOHvGvM6f
— Supriya Sule (@supriya_sule) July 2, 2023
एका शब्दात सुळेंची प्रतिक्रिया - अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर स्वत: शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चे नाव घेतले आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुप्रिया सुळे यांनी ‘प्रेरणास्थान’ असे एका शब्दात आपली भावना व्य़क्त केली आहे.
शरद पवार प्रेरणास्थान - अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? असा प्रश्न यावेळी पवार यांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी स्वत:चा हात उंचावत 'शरद पवार' असे उत्तर दिले आहे. हाच व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला असून ‘प्रेरणास्थान’ असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.
अजित पवार यांचे बंड - अजित पवार यांनी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रविवारी त्यांनी राष्ट्रवादीत भूकंप करत सर्वांना धक्का दिला. राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. तसेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य 8 आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत.
हेही वाचा -
- NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया
- Maharashtra Political Crisis : ' ... म्हणून आम्ही एकत्र आलो, कोण क्लिन बोल्ड झाले हे सर्वांनी पाहिले'
- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री! अजित पवारांनी घेतली 3 वर्षांत तिसऱ्यांदा शपथ