मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या बैठकीला एमईटी निवडल्यानंतर आता तीव्र विरोध होऊ लागला आहे. एमईटी ट्रस्टी सुनील कर्वे यांनी थेट धर्मदायुक्तांकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. एमईटीमध्ये राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊ नये, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पवारांच्या बैठकीला विरोध झाल्याने बैठकी आधीच डोकेदुखी वाढली आहे. मात्र, दोन्ही बाजूनी लावण्यात आला आहे. आज शक्तीप्रदर्शन होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक : पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. शरद पवार यांनी वायबी सेंटर तर अजित पवार यांची एमईटीमध्ये बैठक होणार आहे. परंतु, एकाच पक्षाच्या दोन बैठका होत असल्याने, नेमके कोणाच्या बाजूने उभे राहायचे, या संभ्रमात पदाधिकारी आहेत. मात्र, त्यापूर्वीच बैठकीच्या जागेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
अजित पवार गटाच्या बैठकीला विरोध : राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यानंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची एमईटीमध्ये बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, खासदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार गटाच्या बैठकीला विरोध होऊ लागला आहे. एमईटी शैक्षणिक संस्था आहे. मात्र, तिचा हवा तसा वापर होतो आहे. राजकीय बैठका देखील सातत्याने होतात. एमईटीचे ट्रस्टी सुनिल कर्वे यांनी याला विरोध करत धर्मादाय आयुक्तांना एमईटीच्या जागेवर राजकीय बैठका होऊ नयेत, असे पत्र लिहिले आहे. शैक्षणिक संस्थेचे पावित्र धर्मादाय आयुक्तच थांबवू शकतात, पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis Updates: अजित पवारांच्या बैठकीपूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्यासह काही आमदार देवगिरी बंगल्यावर दाखल
- Maharashtra Political Crisis : शरद पवारांनी बोलावली बैठक, राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी; अजित पवारांनीही बैठकीसाठी पाठवली नोटीस
- NCP Political Crisis: राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण; अजित पवारांनी बोलावली बैठक, किती आमदारांचा आहे पाठिंबा?