मुंबई - हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील ४ आरोपींचे शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेनंतर माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या आरोपींचे केलेले एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. अत्याचार करणाऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता असल्याचेही सुळे म्हणाल्या.
-
बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं...
— Supriya Sule (@supriya_sule) December 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं...
— Supriya Sule (@supriya_sule) December 7, 2019बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं...
— Supriya Sule (@supriya_sule) December 7, 2019
हैदराबाद पोलिसांनी केलेली चकमक ही वादात सापडली आहे. अनेकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी चौकशी पथक पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. मानवाधिकार आयोग तपासाबाबत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल तयार करणार आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे का? याची तपासणी करणार आहे.
या घटनेवर सुप्रिया सुळेंनी ट्वीटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. आरोपींना निश्चित वेळेत कठोर शिक्षा देण्यासाठी कायदे कडक करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणल्या.