मुंबई BJP Criticized Jitendra Awhad : नागपूर मधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राजकीय वर्तुळात धक्कादायक चर्चा सुरू झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. नागपूरमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक वैचारिक बैठक नुकतीच पार पडली. (Assembly Election 2024) नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.
-
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे…
">नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2023
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे…नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2023
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे…
जितेंद्र आव्हाड यांची विधाने कपोल कल्पित : यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता भाजपाचे प्रवक्ते ॲड. शिवराय कुलकर्णी म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्यं ही अत्यंत हास्यास्पद आहेत. अधिवेशन काळामध्ये नागपुरात येणाऱ्या विधिमंडळ सदस्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या भेटीचे आयोजन करण्यात येते. या बैठकीमध्ये कोणत्याही पद्धतीची राजकीय चर्चा होत नाही. निवडणुकांच्या संदर्भातल्या निर्णयाची चर्चा ही केवळ भाजपात होते, संघात होत नाही. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्यासोबतचा गट हा सत्तेत सहभागी झाल्याने ते अस्वस्थ झाले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीची विधाने करत आहेत. या विधानांना काहीही अर्थ नाही. भाजपासोबत असलेले घटक पक्ष हे महायुतीत एकत्र आहेत आणि एकत्रच निवडणुका लढवतील, असेही शिवराय कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यांच्या वक्तव्याला आधार नाही : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले आहेत की, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला कसलाच आधार नाही. केवळ त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते आता मनाला येईल ते बोलत आहेत. अशा पद्धतीची वक्तव्यं करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा एवढेच ते आता विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत. बाकी त्यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. शिवसेना शिंदे गट हा शिवसेना म्हणूनच निवडणुकीत उतरणार आहे आणि महायुतीतील घटक पक्ष म्हणूनच लढणार आहे, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: