मुंबई : येत्या काळामध्ये केंद्रीय एजन्सीच्या नावाने, पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या पद्धतीने राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केला गेला. तो देशाने पाहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील नोटीस पाठवली आहे. आम्ही कायदेशीरपणे लढा देवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रिस्टो यांनी दिली आहे
कायदेशीर लढा देऊ : ईडीकडून जयंत पाटील यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. अशाच प्रकारच्या नोटीसा आणखी लोकांना आल्या आहेत. आम्ही सर्व वाट बघत आहोत. अजून कधी आणि केव्हा किती लोकांना नोटीस येतील. यावरून हे लक्षात येत आहे, सत्तेचा गैरवापर हा वारंवार केला जात आहे. या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई करू, अशा प्रकारचा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. संविधानाची ज्यांच्यावर जबाबदारी असते, त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे.
चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश : राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय गुरूवारी सुप्रीम कोर्टात घोषित करण्यात आला. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे. आयएएल आणि एफएलएसच्या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला जात आहे. उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याबाबतचा आदेश नोटीसमध्ये दिला असल्यास समजते. मला याबाबत कोणती नोटीस मिळाली नसल्याचे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
राज्यपाल नियुक्ती : आपल्या देशात राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राज्याला लाभलेले राज्यपाल आहे. ते जेव्हा इथे होते, तर मी जाहिरपणे बोललो आहे. संविधानात राज्यपाल हे एक इन्स्टिट्युशन आहेत. एक लक्ष ठेवून राज्यपालांची निवड केली जाते. जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक अन्य राष्ट्रीय विचारांचे लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल, ही भूमिका घेऊन या नियुक्त्या केल्यानंतर असा प्रकार पाहायला मिळतो.
भाजपा विरोधात प्रचार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टी विरोधात प्रचार करणे अधिकच सोपे होणार आहे. ज्या पक्षाच्या नावाने निवडून येतात, त्या पक्षाचा मान सन्मान ठेवून देखील गरजेचे आहे. पक्षाचा आदेश पाळणे देखील महत्वाचे आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेणे बाकी आहे. नैतिकता आणि भाजप यांचा काही संबंध असेल, असे मला वाटत नसल्याचे देखील यावेळी शरद पवार यांनी बोलून दाखवले.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय : राज्यातील जे राज्यकर्ते आहे, त्यांची तीव्र भूमिका कोर्टाने त्या ठिकाणी मांडली. हा एक महत्वाचा निकाल दिसत आहे. निकालाची कॉपी हातात आल्यावर मी याबाबत अधिक बोलू शकेल. विधिमंडळ पक्ष सध्या फायनल नाही. त्यामुळे राजकीय पक्षाच्या सुचनेने लोक निवडणूक लढावतात आणि निवडून येतात. हा त्या पक्षाचा आदेश महत्वाचा असतो. हे आज कोर्टाने सांगितलेले दिसते. मला वाटते काही निर्णय व्हायचे आहे. कोर्टाने आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय स्पीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याबाबत स्पीकर याबाबची भूमिका घेतील, ते बघू या. येत्या काळामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून माझा महाराष्ट्राचा दौरा सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एक दिलाने पुढेही एकत्र काम करणार असल्याचा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर भगतसिंह कोश्यारींचा माध्यमांनाच खोचक प्रश्न, म्हणाले...
हेही वाचा : Amol Mitkari On SC Verdict : राज्यपालांवर कारवाई व्हायला हवी - आमदार अमोल मिटकरी