ETV Bharat / state

राष्ट्रवादीतून 'आउटगोइंग' सुरुच; माजी मंत्री राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनावाशी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

author img

By

Published : Jul 28, 2019, 4:26 AM IST

राष्ट्रवादीतून 'आउटगोइंग' सुरुच; माजी मंत्री राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई - लोकसभेच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी देण्याचा सपाटाच लावला आहे. काही तासांपूर्वीच राष्ट्रवादीच्या महिला अघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदासह पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनावाशी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीतून 'आउटगोइंग' वाढले आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर लगेचच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून तब्बल दहा आमदार तसेच काही नेते राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत दाखल होणार असल्याचे स्पष्ट असतानाच आता त्या पार्श्वभूमीवर टोपे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संदर्भात टोपे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकणार नाहीत. मात्र त्यांच्याकडे त्यांच्या अनेक संस्थाचा, आणि इतर व्यवसायाचा मोठा कारभार असून त्यावर दबाव तंत्र वापरले गेले तर ते राष्ट्रवादी सोडतील, असेही सांगण्यात आले.

टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक निष्ठावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तूर्तास त्यांना आपल्या प्रभावाची कोणती अडचण नसली तरी सत्ता आणि त्याजवळ राहणे अधिक हिताचे असल्याने, त्यांनी ठरवले तर ते सेनेत अथवा भाजपा मध्ये जाऊ शकतात असेही बोलले जात आहे.

Intro:राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का; माजी मंत्री राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चाBody:राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का; माजी मंत्री राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा

(फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. २९. :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीतून आउटगोइंग वाढले असून मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर लगेचच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून तब्बल दहा आमदार तसेच काही नेते राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत दाखल होणार असल्याचे स्पष्ट असतानाच आता त्या पार्श्वभूमीवर टोपे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात टोपे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकणार नाहीत, मात्र त्यांच्याकडे त्यांच्या अनेक संस्थाचा, आणि इतर व्यवसायाचा मोठा कारभार असून त्यावर दबाव तंत्र वापरले गेले तर ते राष्ट्रवादी सोडतील असेही सांगण्यात आले.
टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक निष्ठावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तूर्तास त्यांना आपल्या प्रभावाची कोणती अडचण नसली तरी सत्ता आणि त्याजवळ राहणे अधिक हिताचे असल्याचे त्यांनी ठरवले तर ते सेनेत अथवा भाजपा मध्ये जाऊ शकतात असेही बोलले जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.