ETV Bharat / politics

"प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार"; उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱयांसह RSS वर जोरदार टीका केली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

Uddhav Thackeray Dasara Melava
उद्धव ठाकरे दसरा मेळावा (Source - ETV Bharat)

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा (Uddhav Thackeray Dasara Melava) दादरमधील शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "शिवसेना म्हणजे वाघनखं आहेत, दिल्लीकरांच्या कितीही पिढ्या आल्या तरी आम्ही त्यांना गाडून टाकू. मला आणि शिवसेनेला नेस्तानभूत करायचं हे त्यांनी ठरवलंय. जनतेचं पाठबळ नसतं, तर मी उभा राहू शकलो नसतो," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदेंवर प्रहार केला.

भाजपाचं बुरसटलेलं हिंदुत्व : भाजपाचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदुत्व असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपाशी लढतोय हे बरोबर की चूक? मिंधेंचा विचार हा बाळासाहेबांचा विचार नसल्याचंही ठाकरे म्हणाले. अदानी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान, असं मिंधेंनी लिहायला पाहिजे. मला कुत्रे आवडतात, लांडगे नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला : "छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. भाजपानं मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. त्यातही त्यांनी पैसे खाल्ले, सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहोत," अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.

अमित शाहांवर हल्लाबोल : "शकुनी मामा कोण तुम्हाला माहीत आहेच," असं म्हणत ठाकरेंनी नाव न घेता अमित शाहांवर हल्लाबोल केला. "कौरवांची वृत्ती तीच यांची वृत्ती. फक्त भाजपा शिल्लक राहावी हीच यांची नीती," असं म्हणत भाजपावर टीकास्त्र डागलं. "महाराष्ट्रात यांना खांद्यावर घेऊन फिरवलं हे आमचं पाप आहे. पण आता यांना आम्ही खांदा देणार. ज्यांना मी मोठं केलं, तेच आज माझ्यावर वार करत आहेत. आपल्यावर चालून येणाऱ्यांचा राजकीय शिरच्छेद केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुद्धा राक्षस मारले, अफजल खानसुद्धा राक्षसच होता," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राची लूट केली - आदित्य ठाकरे : "शिंदे सरकार या राज्याला विकायला निघालं आहे. आपल्याला एकत्र यावं लागणार असून, एकजूट दाखवावी लागेल. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट केली. A पासून Z पर्यंत सगळे भ्रष्ट आहेत. हे भ्रष्ट सरकार संपवायला हवे आणि महिन्याभरात आमचं सरकार स्थापन होईल, तेव्हा सर्वांच्या फायली उघडल्या जातील," असा इशारा आदित्य ठाकरेंनी महायुतीला दिला.

मुख्यमंत्र्यांनी जमीन विकून पैसे दिले नाहीत - सुषमा अंधारे : दसरा मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारेंनी 'लाडकी बहीण योजने'वरून सरकारला टोला लगावला. "दीड हजार रुपये आम्हाला फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून दिले नाहीत. ना मुख्यमंत्र्यांनी आपली जमीन विकून पैसे दिले नाहीत. हे आमचेच पैसे आहेत, राज्यातील जनतेच्या टॅक्समधून पैसे दिले आहेत. त्यामुळं बेक्कार क्रेडिट घेऊ नका," असा घणाघात सुषमा अंधारेंनी केला.

फेक नरेटिव्हचे केंद्र देवेंद्र फडणवीस : "राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही," असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. "देवेंद्र फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला आहे. सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत," असंही त्या म्हणाल्या. "तुमचे हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसच्या बाटग्यांचे असू शकतात. अत्याचार झालेल्या महिलेला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. कुणाचं फेक नरेटिव्ह आहे, खरं तर फेक नरेटिव्हचे केंद्र देवेंद्र फडणवीस आहेत," असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा

  1. ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेवू नका - मुख्यमंत्री
  2. "आचारसंहिता लागल्यावर भूमिका मांडणार, उलथापालथ करावी लागणार", मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.