मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा शुक्रवारी राजीनामा दिला होता. अजित पवारांनी कोणतेही कारण न देता राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी राजीनामा नेमका का दिला याची सर्वांना उत्सुकता होती. याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
आपल्यामुळे या वयात शरद पवारांना त्रास होऊ नये म्हणून आपण राजीनाम्याच्या निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले. माझ्या सदविवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. मात्र, माझ्या सहकाऱ्यांना माझ्या या राजीनामा देण्याचा त्रास झाला. माझ्या सर्व सहकाऱ्यांना याबाबत सांगितले असते तर त्यांनी मला राजीनामा देण्यापासून अडवले. मात्र, मी त्यांच्या भावना दुखावल्या त्यासाठी मी माफी मागतो. शुक्रवारी मी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मी तीन दिवसांपूर्वी फोन केला होता. काही दिवसांपासून माझ्या मनात ही भावना होती. मात्र, हा निर्णय घेताना पक्षाला काही नुकसान होऊ नये म्हणून मी विचार करत होतो. राजीनामा देणे माझी चूक झाली की नाही मला माहीत नाही, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !
शिखर बँकेच्या बोर्डावर माझे सहकारी होते. या बँकेत १ हजार 88 कोटींची अनियमितता झाली आहे. मग २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा? त्यामुळे बँकेच्या इतिहासात अनेकजण या कारभारात होते. काही प्रशासकीय अधिकारीही या बोर्डावर काम करत होते. त्यामुळे त्याकाळातील परिस्थितीही लक्षात घ्यायला हवी. शिखर बँकेच्या माध्यमातून सहकारी कारखाने सूत-गिरण्यांना मदत करावी लागते. त्यासाठी कधी नियमबाह्यपणे मदत करावी लागते, आताच्या सरकारनेही अशीही मदत केली आहे. धनंजय महाडिक, पंकजा मुंडे, विनय कोरे, कल्याण काळे (पंढरपूर) यांच्या कारखान्यांना सरकारने बजेटमधून मदत केली. तेही नियमबाह्यच आहे, असे पवार म्हणाले.
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असेल तर अनेक चौकशांना आम्ही सामोरे जात आहोत. त्यातील काही चौकशा पूर्ण व्हायच्या आहेत. तोवरच न्यायालयाने गुन्हे दाखल केले. मात्र पवारसाहेबांच्या नावाचा कुठेही सहभाग नसतानाही त्यांचे नाव कशाला गोवले. पवार साहेबांमुळे इथेपर्यंत पोहोचलो, मग केवळ माझ्या नावामुळे पवार साहेबांचे नाव माध्यमात येऊ लागले म्हणून मी अस्वस्थ झालो. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा विचार केला.
हेही वाचा - 'माझ्यावरील कारवाईमुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा'
माझ्यामुळे साहेबांना त्रास होऊ नये अशी माझी भूमिका आहे. पण मला काय करावे हे कळत नाही. मी जर दोशी असेल तर ईडीने खुशाल चौकशी करावी. मात्र, पवारसाहेबांचे नाव निवडणुकीच्या तोंडावरच कसे काय समोर आणले जाते, असा सवालही अजित पवारांनी यावेळी केला.
मी हरिभाऊ बागडेंना राजीनामा मंजूर करायला विनंती केली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर केला. राजीनाम्यानंतर माध्यमांनी अनेक तर्क-वितर्क लावले. मात्र, मी बारामतीत पूरग्रस्तांची मदत करत होतो. त्यामुळे मुंबईला यायाला जमले नाही आणि ईडी कार्यालयात जाण्यासाठी येत असताना रस्त्यावर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईकडे येत होते. त्यामुळे मी येऊ शकलो नव्हतो, असे पवार म्हणाले.
आमच्या घरात गृहकलह नाही..
आमच्या घरात कोणत्याही प्रकारचा गृहकलह नाही. या सर्व बातम्या माध्यमांनी पेरलेल्या आहेत. आमचा परिवार मोठा असला तरी कुटुंब प्रमुखांचे आम्ही ऐकतो. आमचे घर आजही एकत्र आहे. रोहित, पार्थ यांना उमेदवारी यासारखी काहीही वावड्या उठवण्याची गरज नाही. आम्ही आजही एकत्र आहे आणि राहिन असे पवार म्हणाले.
अजित पवार भावनिक
निवडणुकीच्या निमित्ताने २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा विषय समोर आणला जातो. जनतेला वाटेल की अजित पवारांना हजार कोटींशिवाय काय सूचते का नाही, असे म्हणत अजित पवार भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
हेही वाचा - अनिल गोटे धुळे शहर विधानसभेसाठी शिवसेनेकडून लढणार?
अजित पवार विधानसभेचा राजीनामा दिला. ईडी चौकशीच्या सामोरे जाण्याची भूमिका घेतली. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे समर्थन केले. त्यानंतर सायंकाळी अजित पवारांनी राजीनामा दिल्याची माहिती आली. मात्र शरद पवार साहेंबाच्या ईडी चौकशी प्रकरणामुळे दादा अस्वस्थ होते. ईडीच्या चौकशीमुळे आपल्या कुटुंबातील प्रमुखाला या वयात तोंड द्यावे लागले. या गोष्टीमुळे अजित पवार भावनिक झाले होते. त्यामुळे आज त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
लाईव्ह अपडेट
- मुख्यमंत्र्यांनी आमची खुशाल चौकशी करावी, मात्र कितीवेळ चौकशी करायची त्यातून काय तरी आऊटपूट यायला पाहिजे - अजित पवार
- शरद पवारांचा या प्रकरणात काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर या वयात आरोप केले जात असल्याने प्रचंड नाराज झालो - अजित पवार
- या प्रकरणात अनेकांची नावे असताना अजित पवारांनाच लक्ष्य केले जात आहे - जयंत पाटील
- आमच्या परिवारातील काही जण पक्षाला सोडून गेले, याचे दु:ख आहेच.
- आम्हाला काय भावना वैगेर आहेत का नाहीत, लोकं म्हणतील सारखे घोटाळेच कसे करतोय.
- शरद पवारांच्या सूचनेनुसारच पत्रकार परिषद घेतली.
- गृहकलह वैगेर काही नाही, आमच्या घरचे वातावरण चांगले. आमच्यासाठी पवार साहेबांचा शब्द अंतिम
- अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनाही राजीनाम्याचे कारण दिले नाही.
- ईडी वैगेरे निवडणुकीच्या तोंडावरच कसे चालू होते.
- तीन दिवसांपूर्वीच राजीनामा देणार होतो
- आपल्यामुळे पवार साहेबांची बदनामी होते त्यामुळे अतिशय अस्वस्थ झालो. आपल्यामुळे शरद पवारांना त्रास होऊ नये म्हणून राजीनामा दिला.
- २८५ कोटी रुपये बँक फायद्यातच आहे - पवार
- राज्य सरकारने चार सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य मदत केली - पवार
- सहकाऱ्यांना अडचणीत आणल्यामुळे मी नाराज - अजित पवार
- ईडीच्या विषयामुळे अजित पवार भावूक - जयंत पाटील
- कुटुंब प्रमुखांना त्रास दिल्यानं अजित पवारांनी राजीनामा दिला- जयंत पाटील