ETV Bharat / state

राष्ट्रवादीने विधानसभेसाठी दिली ३५ नव्या चेहऱ्यांना संधी; तर 22 जणांना पुन्हा संधी

author img

By

Published : Oct 3, 2019, 4:39 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 19 विद्यमान आमदार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यात पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांची भर पडली असल्याने एकूण 20 विद्यमान आमदार राष्ट्रवादी कडून पहिल्या उमेदवारी यादीत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीतून मैदानात उतरले आहे.

राष्ट्रवादीने विधानसभेसाठी दिली ३५ नव्या चेहऱ्यांना संधी; तर 22 जणांना पुन्हा संधी

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी 77 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत तब्बल 35 नवे चेहरे राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत. तर मागील निवडणुकीमध्ये केवळ दोन ते चार हजार मतांच्या फरकाने आणि त्याहून अधिक मताने पराभव झालेल्या तब्बल 22 जणांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे.

mumbai

हे ही वाचा - राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 19 विद्यमान आमदार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यात पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांची भर पडली असल्याने एकूण 20 विद्यमान आमदार राष्ट्रवादी कडून पहिल्या उमेदवारी यादीत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीतून मैदानात उतरले आहे. तर आदिती ठाकरे यांना श्रीवर्धन मधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये मागील अनेक वर्षांपासून खासदार आणि आमदार अशा विविध पदासाठी उमेदवारी मिळवलेल्या संजय दिना पाटील यांचा मात्र यावेळी पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या ठिकाणी मुंबईत धनंजय पिसाळ या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सदस्य विद्या चव्हाण यांना दिंडोशी मधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक पुन्हा एकदा अनुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असून त्यांचे नाव या पहिल्या यादीत समाविष्ठ करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कडून तिकीट नाकारण्यात आले होते. परंतु यावेळी त्यांना सिंदखेडराजा येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे.

हे ही वाचा - भाजपची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, खडसे-तावडे यांचे नाव नाही

बाहेरून आलेल्यांना उमेदवारी :-

मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना राष्ट्रवादीने या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. यामध्ये कल्याण पूर्व येथून प्रकाश तरे, बुधवारी प्रवेश केलेले सिन्नर येथील माजी आमदार माणिकराव कोकाटे, अमळनेर येथून भाजपातून आलेले अनिल पाटील, चोपडा येथून आलेले जगदीश वळवी यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. त्यासोबत साताऱ्यात भाजपाला सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले दीपक पवार, नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून सेनेतून आलेले आशुतोष काळे यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे.

हे ही वाचा - 'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'

दोन माजी आमदार पुत्रांना उमेदवारी :-

यवतमाळ येथून बंजारा समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांना उमेदवारी देण्यात आली असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने बंजारा समाजाला मोठे स्थान दिले आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातून शंकर आण्णा धोंडगे यांचे पुत्र दिलीप धोंडगे यांना लोहा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

Intro:राष्ट्रवादीने दिले ३५ नवे चेहरे तर 22 जणांना दिली पुन्हा संधी; धनंजय मुंडे यांनाही मैदानात उतरवले

mh-mum-01-ncp-1st-list-7201153

(विश्लेषणाची बातमी आहे, यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. २ :

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज पहिली ७७ जणांची यादी जाहीर केली असून या यादीत तब्बल 35 नवे चेहरे राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत तर मागील निवडणुकीमध्ये केवळ दोन ते चार हजार मतांच्या फरकाने आणि त्याहून अधिक मताने पराभव झालेल्या तब्बल 22 जणांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 19 विद्यमान आमदार मैदानात आहेत. त्यात आणखी पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान भारत भालके. यांची भर पडली असल्याने एकूण 20 आमदार राष्ट्रवादी कडून पहिल्या उमेदवारी यादीत उतरवले आहेत. विशेष म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीतून मैदानात उतरले आहे. तर आदिती ठाकरे यांना श्रीवर्धन मधून उमेदवारी देण्यात आली आहे तर मुंबईमध्ये मागील अनेक वर्षांपासून खासदार आणि आमदार अशा विविध पदासाठी उमेदवारी मिळवलेल्या संजय दिना पाटील यांचा मात्र यावेळी पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या ठिकाणी मुंबईत धनंजय पिसाळ या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.तर विधान परिषदेच्या सदस्य विद्या चव्हाण यांना दिंडोशी मधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक पुन्हा एकदा अनुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असून त्यांचे नाव या पहिल्या यादीत समावेश करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कडून तिकीट नाकारण्यात आले होते, परंतु यावेळी त्यांना सिंदखेडराजा येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे.

*"**
बाहेरून आलेल्यांना उमेदवारी

मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना राष्ट्रवादीने या पहिल्या यादीत उमेदवारी देऊन त्यांना स्थान दिले आहे. यामध्ये कल्याण पूर्व येथून प्रकाश तरे, बुधवारी प्रवेश केलेले सिन्नर येथील माजी आमदार माणिकराव कोकाटे, अमळनेर येथून भाजपातून आलेले अनिल पाटील, चोपडा येथून आलेले जगदीश वळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली आहे. त्यासोबत साताऱ्या त भाजपाला सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले दीपक पवार, नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून सेनेतून आलेले आशुतोष काळे यांनीही राष्ट्रवादीने उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे.

*****

दोन माजी आमदार पुत्रांना उमेदवारी
यवतमाळ येथून बंजारा समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांना उमेदवारी देण्यात आली असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने बंजारा समाजाला मोठे स्थान दिले आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातून शंकरांना धोंडगे यांचे पुत्र दिलीप धोंडगे यांना लोहा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Body:राष्ट्रवादीने दिले ३५ नवे चेहरे तर 22 जणांना दिली पुन्हा संधी; धनंजय मुंडे यांनाही मैदानात उतरवलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.