मुंबई : आज सकाळी अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांची तातडीने बैठक घेतली होती. ही बैठक अजित पवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. सुळे पत्रकारांशी न बोलता निवासस्थानातून निघून गेल्या. ही बैठक दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती.
भाजपची देखील पत्रकार परिषद : अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्याचवेळेस दुसरीकडे भाजपची देखील पत्रकार परिषद सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी देखील आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अजित पवार यांच्या बैठकीवर शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, बैठक का बोलावली आहे, हे माहित नाही. पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार आहे. तशी बैठक ते बोलवत असतात, असे पवार त्यांच्या बैठकीत म्हणाले होते.
दुपारी घेतली शपथ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सकाळी झालेल्या बैठकीनंतर दुपारी 29 आमदारांसह राजभवनात पोहोचले होते. त्यांनी दुपारी 2 वाजता शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे ज्येष्ठ राजकारणी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० हून अधिक आमदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवनात पोहोचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीम, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील यांनी आतापर्यंत शपथ घेतली आहे.
हेही वाचा :