ETV Bharat / state

घरगुती गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शने

author img

By

Published : Dec 27, 2020, 10:07 PM IST

Updated : Dec 27, 2020, 10:16 PM IST

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये केंद्र सरकार विरोधात चूल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने गॅस दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वास्तूमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने रविवारी (दि. 27 डिसें.) राज्यभर आंदोलन करण्यात आले.

पुणे - केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवावेत. दरवाढीने महिलांना भगिणीचं आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाही. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन करु, असा इशारा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. हे आंदोलन पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

पुण्यातील राष्ट्रवादीचे आंदोलन

सोलापूर - गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सोलापुरातील चार हुत्मात्मा परिसरात रस्त्यावर चूल मांडून अनोखे आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने चुकीचे निर्णय घेत आहे. नोटाबंदी, शेतकरी विरोधी कृषी कायदा किंवा गॅस दरवाढ यासारखे अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीने हे आंदोलन करून गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

सोलापुरातील आंदोलन

बीड - केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस दरामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत दिलेले गॅस आता पुन्हा भरून घेण्यासाठी गोरगरीब नागरिकांना अधिक पैसे भरावे लागत आहेत. याविरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष माधुरी घुमरे, कमल निंबाळकर यांच्यासह महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (दि. 27 डिसें.) निदर्शने करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

बीड येथील आंदोलन

यवतमाळ - गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. या दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून रविवार (दि. 27 डिसें.) यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात चूल पेटवून आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ येथील आंदोलन

नंदुरबार - इंधन दरवाढी निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून सिलिंडरचे दर सतत वाढत असल्याने नंदुरबार मधील धुळे चौफुली येथे रिकामा सिलिंडर ठेवत बाजूला चुल पेटवून रस्त्यावर भाकर टाकत आंदोलन करण्यात आले.

नंदुरबार येथील आंदोलन

ठाणे - केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यात आज (रविवार) "चूल आंदोलन" करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी शेणाच्या गोवऱ्यांवर चूल पेटवून त्यावर भाकऱ्या भाजून केंद्र सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

ठाणे येथील आंदोलन

जळगाव - केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रस्त्यावर चूल पेटवा आंदोलन करून भाकरी भाजल्या. तसेच गॅस दरवाढ लगेच मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जळगाव येथील आंदोलन

हेही वाचा - वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस : माझा अंदाज खरा ठरला - सचिन सावंत

हेही वाचा - ईडी कार्यालयाला टाळे ठोकायची वेळ; शिवसेनेचा संताप

Last Updated : Dec 27, 2020, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.