मुंबई : अमली पदार्थ प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. कथित अमली पदार्थसंदर्भात व्हाट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्यासंदर्भात दीपिका आणि अन्य अभिनेत्रींची चौकशी केली जाणार आहे. दीपिका व्यतिरिक्त श्रद्धा कपूर यांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. यात श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहेत.
-
Deepika Padukone has been summoned on September 25 while Shraddha Kapoor and Sara Ali Khan have been summoned on September 26. https://t.co/uPARX6Setw
— ANI (@ANI) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Deepika Padukone has been summoned on September 25 while Shraddha Kapoor and Sara Ali Khan have been summoned on September 26. https://t.co/uPARX6Setw
— ANI (@ANI) September 23, 2020Deepika Padukone has been summoned on September 25 while Shraddha Kapoor and Sara Ali Khan have been summoned on September 26. https://t.co/uPARX6Setw
— ANI (@ANI) September 23, 2020
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या अमली पदार्थ प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एनसीबीसमोर बॉलिवूडमधील 'ड्रग्ज नेक्सस' समोर आले आहे. एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि एक टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपीकर यांची चौकशी करणार आहे. एनसीबीने समन्स बजावून दीपिकाला २५ सप्टेंबरला हजर राहण्याचे तर, श्रद्धा कपूर आणि सारा अली यांना २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील तपासादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींचे कथितपणे अमली पदार्थांसंदर्भात कनेक्शन समोर आले असून त्याची आता चौकशी सुरू आहे. सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा हिची देखील एनसीबीने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस चौकशी केली. तर, उद्या देखील एनसीबी तिची चौकशी करू शकते. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 17हून अधिक लोकांना अटक केली आहे. ज्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण -
सुशांतसिंह राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थ प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे पुढे आली आहेत.