मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबईतील युनिटने दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून 3056 एस्टेसी गोळ्या जप्त केल्या. एस्टेसी गोळ्यांचा अंमली पदार्थात समावेश होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या कारवाई दरम्यान 986 ग्रॅम वजनाच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. हे अमली पदार्थ बेल्जियममधून आणणा-या नवी मुंबईतील एका दाम्पत्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
-
Mumbai Zonal Unit of NCB seized a total of 3,056 ecstasy pills (986 gms) from 2 different places in Mumbai recently. Navi Mumbai couple, who sourced the drug from Belgium, arrested in the case: KPS Malhotra, Deputy Director (Ops), Narcotics Control Bureau pic.twitter.com/MhRwChylaE
— ANI (@ANI) August 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai Zonal Unit of NCB seized a total of 3,056 ecstasy pills (986 gms) from 2 different places in Mumbai recently. Navi Mumbai couple, who sourced the drug from Belgium, arrested in the case: KPS Malhotra, Deputy Director (Ops), Narcotics Control Bureau pic.twitter.com/MhRwChylaE
— ANI (@ANI) August 20, 2020Mumbai Zonal Unit of NCB seized a total of 3,056 ecstasy pills (986 gms) from 2 different places in Mumbai recently. Navi Mumbai couple, who sourced the drug from Belgium, arrested in the case: KPS Malhotra, Deputy Director (Ops), Narcotics Control Bureau pic.twitter.com/MhRwChylaE
— ANI (@ANI) August 20, 2020
या प्रकरणी एनसीबीने एच. ए. चौधरी व आर. बाथरी या दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे सॉफ्टटॉय च्या कार्डबोर्ड मध्ये लपविण्यात आले होते. एस्टेसी गोळ्या हे उच्च प्रतीचे अमली पदार्थ असून याची काळ्या बाजारात मोठी मागणी आहे. गर्भश्रीमंत उच्चभ्रू वर्गात याची मोठी मागणी आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्हावा शेवा बंदरात कस्टम अधिकाऱ्यांना अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला होता. तब्बल 191 किलो वजनाचे आणि सुमारे 1000 कोटी रुपये किमतीचे हे ड्रग्ज अफगानिस्तानमधून भारतात आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळल्यानंतर यावर कारवाई करण्यात आली होती.