ETV Bharat / state

फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये एनसीबीची कारवाई - drugs in mumbai

कॅनडा मार्गे मुंबईत कुरियरच्या माध्यमातून फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयमध्ये पाठवण्यात आलेले दोन किलो उच्च प्रतीचे कॅनबिज ( गांजा) हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये एनसीबीची कारवाई
फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये एनसीबीची कारवाई
author img

By

Published : Jun 10, 2021, 3:32 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. कॅनडा मार्गे मुंबईत कुरियरच्या माध्यमातून फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयमध्ये पाठवण्यात आलेले दोन किलो उच्च प्रतीचे कॅनबिज ( गांजा) हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, फॉरेन पोस्ट ऑफिस या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी 2 किलो 200 ग्राम कॅनबिज अंमली पदार्थ मिळून आले आहे. सदरचे अमली पदार्थ एका निळ्या कलरच्या कार्टून बॉक्समध्ये लपविण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत 5000 ते 8000 रुपये प्रतिग्राम असून हे पार्सल कॅनडामधील विटर येथून मुंबईला पाठवण्यात आले होते. दरम्यान सदरचे अंमली पदार्थ मुंबईतील कुठल्या व्यक्तीला पाठवण्यात आले होते याचा शोध एनसीबी घेत आहे.

कॅनबिज ( गांजा) या अंमली पदार्थाचा उपयोग मनोरुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधी रूपात केला जातो. मात्र गांजाचे व्यसन असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर काळे डाग यामुळे पडतात. गांजाचे सेवन केल्यामुळे व्यक्तीच्या उत्तेजना वाढत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.