ETV Bharat / state

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; २० लाखाच्या गांजासह दोघांना अटक - २० लाखाच्या गांजासह दोघांना अटक

समीरच्या घरझडतीत 54 ग्रॅम एमडी आणि ड्रग्ज तस्करीतून जमा झालेले 17 लाख 90 हजार रोख आढळून आले आहे. यात काही परदेशी चलन, आणि चाकूचाही समावेश आहे. समीरचा शोध सुरू आहे. याच प्रकरणात बदलापूर येथून ड्रग्ज तस्करी होत असल्याचं समोर आले आहे. एनसीबीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

२० लाखाच्या गांजासह दोघांना अटक
२० लाखाच्या गांजासह दोघांना अटक
author img

By

Published : Apr 18, 2021, 9:29 PM IST

मुंबई - मुंबईतील आग्रीपाडा आणि बदलापूर येथून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोकड जप्त करणयात आले आहे. एनसीबीने ही कारवाई करत 220 ग्रँम एमडी, 43 किलो गांजा आणि 20 लाख रुपये जप्त केले आहे. शिवाय डोंगरी परिसरात सरफराज कुरेशी यांच्या घरी झाडाझडती घेतली. त्यावेळी घरात 2 लाख रुपये रोकडसह ड्रग्ज तस्करी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

सरफराजच्या चौकशीतून त्याला एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारा साथीदार समीर सुलेमान शर्मा यांचे नाव समोर आले. समीरच्या घरझडतीत 54 ग्रॅम एमडी आणि ड्रग्ज तस्करीतून जमा झालेले 17 लाख 90 हजार रोख आढळून आले आहे. यात काही परदेशी चलन, आणि चाकूचाही समावेश आहे. समीरचा शोध सुरू आहे. याच प्रकरणात बदलापूर येथून ड्रग्ज तस्करी होत असल्याचं समोर आले आहे. एनसीबीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. समीर परदेशी आणि अजय नायर अशी या दोघांची नावे आहेत. शिवाय या प्रकरणी एनसीबी अधिक तपास करत आहे.

हेही वाचा -ओएलएक्सवरून कॅमेरे भाड्याने घेऊन ते विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.