ETV Bharat / state

मुंबईतील २१ वर्षीय लेडी डॉनला अटक, चरस आणि एमडीची करायची तस्करी - इकरा कुरेशी

डोंगरी परिसरामध्ये लेडी डॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या इकरा कुरेशी या मुलीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या मुलीकडे दीड लाख रुपयांचे अमली पदार्थ सापडले आहेत.

लेडी डॉनला अटक
लेडी डॉनला अटक
author img

By

Published : Apr 9, 2021, 12:44 PM IST

Updated : Apr 9, 2021, 12:53 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाई सुरू आहे. याचाच भाग म्हणून डोंगरी परिसरातील एका 21 वर्षाच्या तरूणीला अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डोंगरी परिसरामध्ये लेडी डॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या इकरा कुरेशी या मुलीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे.

डोंगरी परिसरात लेडी डॉन....

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक असलेल्या चींकु पठाण , इजाज सायको या दोघांना एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली 21 वर्षीय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेचे नाव इकरा कुरेशी (21) आहे. ती, चरस आणि एमडी या दोन अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी करत होती. ज्या वेळेस अमली पदार्थ विरोधी पथकाने या तरुणीला अटक केली असता, तिच्याकडे दीड लाख रुपयांचे अमली पदार्थ आढळून आले आहे. इकरा कुरेशी ही चिंकू पठाण याच्याकडून अमली पदार्थ घेऊन ते इतर ठिकाणी विकत होती. याबरोबरच इकरांसोबत 5 ते 6 महिला अमली पदार्थ तस्करांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

अमली पदार्थ विक्रीसाठी सोशल मिडीयाचा वापर...

काही दिवसांपूर्वी इकरा कुरेशीच्या प्रियकराला एनसीबी कडून अटक करण्यात आली होती. आपण स्वतः अमली पदार्थ तस्करी संदर्भात एनसीबी कडून अटक केले जाऊ या भीतीमुळे इकरा कुरेशी ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बुरखा घालून मुंबईतील कार्यालयाजवळ फिरत होती. सदरची ही अमली पदार्थ तस्कर महिला इंस्टाग्राम च्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करत होती. सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांशी संपर्क साधून अमली पदार्थ विकले जात असल्याचे, एनसीबीचे म्हणणे आहे. अमली पदार्थांची तस्करी करत असताना ही तरुणी कधीही फोन किंवा इतर संपर्क साधनाचा वापर करत नव्हती.

हेही वाचा - सिंधुदुर्ग : विनयभंगाचा आरोप असलेले डॉ. श्रीमंत चव्हाण यांची पोलीसां समोर शरणागती

हेही वाचा - नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एक जण ठार

Last Updated : Apr 9, 2021, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.