ETV Bharat / state

Malik in judicial custody: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आर्थर रोड तुरुंगात दाखल

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांची ईडी कोठडी आज संपली. त्यामुळे त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले त्या वेळी मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना 21 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी (Malik in judicial custody) सुनावली आहे. ईडीने त्यांना दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Dawood Ibrahim Money Laundering Case) 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सायंकाळी ते आर्थर रोड तुरुंगात दाखल झाले

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Mar 7, 2022, 1:16 PM IST

Updated : Mar 7, 2022, 6:03 PM IST

मुंबई: नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आले आहे. ईडीने रिमांड कॉपी मध्ये म्हटले आहे की नवाब मलिक यांना आतापर्यंत 13 दिवस ईडी कोठडी मिळाली असून पुढील तपासाकरिता मलिक यांच्या कस्टडी ची गरज नसल्याचे ईडी कडुन सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.सायंकाळी ते आर्थर रोड तुरुंगात दाखल झाले आहेत.

  • #WATCH | Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik arrived at Arthur Road Jail. He was sent to judicial custody till 21 March by Special PMLA court in connection with Dawood Ibrahim money laundering case

    He was arrested by ED on Feb 23rd. pic.twitter.com/9nKUNaJzcB

    — ANI (@ANI) March 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई सत्र न्यायालयात नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णयावर मलिक यांच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

मलिक यांना घरचे जेवण, औषधी याकरिता नव्याने अर्ज केला आहे, त्यावर न्यायालयाने सांगितले की या संदर्भात न्यायालयाला विचार करण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या या मागण्यांवर निकाल देता येणार नाही या संदर्भातील निकाल राखून ठेवला आहे. या संदर्भात मुंबई सत्र न्यायालय या संदर्भात निकाल देण्याची शक्यता आहे.

  • Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik sent to judicial custody by Special PMLA court in Mumbai.

    He was arrested by ED on Feb 23rd, in connection with Dawood Ibrahim money laundering case.

    (File photo) pic.twitter.com/k2haFkEdPW

काय आहे प्रकरण?१) 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध.२) नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली.३) कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडे तीन एकर जमीन 20 ते 30 लाखात मलिकांच्या नातेवाईकांना दिली.४) दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अटरनी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली. राज्य सरकार विरुद्ध केंद्रिय तपास यंत्रणा संघर्षमलिक यांच्यावर ज्यावेळी आरोप करण्यात आले होते त्याचवेळी त्यानी आपल्यावरील सर्व आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले होते. माञ ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल कासकरला अटक झाल्यानंतर मलिक यांचे एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आले. मलिक यांना इडीने चौकशी साठी नेल्यानंतर राज्यांतील राजकरण चांगलेच ढवळून निघाले. विरोधकांनी केंद्रीय तपास यंत्रणाचा सरकार चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवार यांनी थेट याला धार्मिक रंग दिला. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. केंद्रिय तपास यंत्रणांनी मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महविकास आघाडीतील नेत्यांनी देखील एकत्र येऊन केंद्रिय तपास यंत्रणांना उघडे पाडण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळें आगामी काळात राज्य सरकार विरुद्ध केंद्रिय तपास यंत्रणा हा संघर्ष होउ शकतो असे जाणकारांचे मत आहे.राष्ट्रवादी सह महाविकास आघाडीला धक्का तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक झाली. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. दाऊदच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.काही नेते अडचणीत येऊ शकतातमुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी रडारवर आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात अशी चर्चा सुरु होती.दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडीअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.

हेही वाचा : Mumbai Mayor On BJP : भाजपमध्ये सामील झालेले लगेच स्वच्छ होऊन जातात - महापौर पेडणेकर

Last Updated : Mar 7, 2022, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.