मुंबई - गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्यासंदर्भात केलेला आरोप पूर्णपणे खोटा असून त्या भाजपचे एजंट आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच शुक्ला यांच्या आरोपातील सर्व बदल्या सुबोधकुमार जयस्वाल यांच्या कार्यकाळातील असल्याचे मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणीस यांनी ठाकरे सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सर्व आरोप खोडून काढले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारस्थापणेपूर्वी सुरू असलेल्या घडामोडींची माहिती मिळविण्यासाठी रश्मी शुक्ला भाजप विरोधकांचे फोन टॅप करत होत्या. त्या भाजपच्या एजंट आहेत असून त्यांना भाजप विरोधी लोकांचे लोकांचे फोन टॅप करण्याची सवय लागली आहे. ही बाब निर्दशनास येताच त्यांना बढती न देता, साईड पोस्ट निर्माण करत त्यांची बदली केल्याचे मलिक म्हणाले.
धिकाऱ्यांना हाताशी धरून केला जातोय सरकार पाडण्याचा आटापिटा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकार जाईल असे ज्या प्रकारे सांगत होते. जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र, सरकार पाडता न आल्याने आता ते उघडे पडले आहेत. त्यामुळेच सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय सचिवांकडे जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते फडणवीस सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना सरकार पाडता येत नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा आटापिटा केला जातो आहे, असे मलिक म्हणाले. तसेच काही अधिकारी भाजपसाठीच काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
केंद्राची परवानगी नाहीच
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे रॅकेट सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक यांना दिली होती. महासंचालकांनी केंद्रीय गृहविभागाला विनंती करुन फोन टॅप करण्याची परवानगी मागितली. परवानगीनंतर पुढे आलेल्या कॉल रेकॉर्डिंगमधून अधिकारी आणि मंत्र्यांची नावे पुढे आली आहेत. या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हणाले. मात्र, फडणवीस खोटे बोलत असून केंद्रीय सचिवालयाने कोणत्याही परवानग्या दिल्या नव्हत्या, असे मलिक म्हणाले.
त्या बदल्या सुबोधकुमार जयस्वाल समितीच्या
रश्मी शुक्ला यांचा अहवाल माझ्याकडे आला आहे. त्यासाठी पैसे घेण्यात आल्याचे बोलत आहेत. पोलिसांच्या बदल्या पोलीस इस्टब्लिशमेंट बोर्ड (पोलीस आस्थापना मंडळ) कडून केल्या जातात. त्यामध्ये सचिव व इतर अधिकारी यांचा समावेश असतो. अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येतो. कोणत्याही मंत्र्याला थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार नसतात. मात्र, शुक्ला यांनी अधिकाऱ्यांची नावे दिले आहेत. पैशाची देवाणघेवाण झाल्याचे म्हटले आहे. पण, त्यापैकी 80 टक्के बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा अहवाल खोटा असून त्यावेळी सर्व पोलिसांच्या बदल्या सुबोधकुमार जयस्वाल यांच्या समितीने केल्या होत्या, असेही मलिक म्हणाले.
हेही वाचा - गृह सचिवांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसदंर्भात सीबीआय चौकशी करावी - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा - पैसे मोजायचे मशिन, फाईव्ह स्टार हॉटेलची राहणी, आता सापडली गोपनीय डायरी