ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे ड्रग्स माफिया सोबत संबंध असल्याचे नवाब मलिक यांनी स्वीकारले - मोहित भारतीय

आघाडी सरकारमधील मंत्री असलेले अस्लम शेख यांना क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ हा पार्टीसाठी सातत्याने आमंत्रण का करत होता? काशीफ खान हा सातत्याने अस्लम शेख पार्टी द्यायला पाहिजे यासाठी फोन करत होता. जर अस्लम शेखसोबत काशीफ खान याची ओळख नव्हती.

mohit bharatiya
मोहित भारतीय
author img

By

Published : Nov 7, 2021, 3:15 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा ड्रग्स माफियासोबत संबंध असल्याचा स्वीकारच आज नवाब मलिक यांनी केला असल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित भारतीय म्हणाले. आपण ज्या गोष्टींचा खुलासा पत्रकार परिषदेतून केला होता त्यातील बऱ्याच गोष्टी नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षरीत्या आपल्या पत्रकार परिषदेतून स्वीकारल्या. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, असे मोहित भारतीय म्हणाले. ते आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलत होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आणि त्यांच्या मुलांचा ड्रग्स माफिया सोबत संबंध आहे. ड्रग्स माफिया आणि त्यांच्या बैठका या ताज हॉटेलमध्ये होत होत्या. या बैठकांना कार्डेलिया कृज पार्टीचा आयोजक काशीफ खान स्वतः उपस्थित असायचा, असा आरोपही मोहित भारतीय यांनी केला. नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सुनील पाटील आणि विजय पगारे हे आपल्या संपर्कात होते, असे सांगून त्यांच्याशी संबंध असल्याबाबत स्पष्टता दिली असल्याचाही यावेळी ते म्हणाले.

माजी गृहमंत्र्यांची ड्रग्स माफिया सोबत बैठक -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये ड्रग्स माफिया असलेला चींकु पठाण याच्यासोबत बैठक केली होती. या बैठकीदरम्यान त्याच्यासोबत कोण कोण उपस्थित होतं? याबाबत चौकशी झाली पाहिजे. चिंकू पठाण हा दाऊद इब्राहिमच्या टोळीचा हस्तक आहे. असे असताना गृहमंत्र्यांनी त्याच्यासोबत बैठक केली, असा खळबळजनक आरोप मोहित भारतीय यांनी केला.

अस्लम शेख यांचे कॉल डिटेल तपासावेत -

आघाडी सरकारमधील मंत्री असलेले अस्लम शेख यांना क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ हा पार्टीसाठी सातत्याने आमंत्रण का करत होता? काशीफ खान हा सातत्याने अस्लम शेख पार्टी द्यायला पाहिजे यासाठी फोन करत होता. जर अस्लम शेखसोबत काशीफ खान याची ओळख नव्हती. तर मग सातत्याने काशिफ अस्लम शेख यांना फोन का करत होता? याआधी अस्लम शेख आणि काशीफ खान यांचे फोनवर बोलणं झालं होतं का? यासाठी असलम शेख यांच्या कॉल डिटेल्स तपासल्या जाव्यात, अशीही मागणी मोहित भारतीय यांनी केली.

तसेच नवाब मलिक यांनी दाढीवाला म्हणून काशिफ खान याचे एका मंत्र्यासोबत संबंध होते, असे सांगितले होते. मग तो मंत्री अस्लम शेख आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे.

हेही वाचा - उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना सुनावली 12 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी; देशमुखांचे वकील म्हणाले...

आपण कधीही ललित हॉटेलमध्ये गेलो नाही -

नवाब मलिक यांनी दलित हॉटेलमध्ये समीर वानखेडे तसेच इतर काही लोकांसोबत आपण बैठका घेत असल्याचा आरोप केला होता. मात्र, या आरोपाचे खंडन भारतीय यांनी केले. गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण कधी ललित हॉटेल असलेल्या परिसरात देखील फिरकलो नाही. याबाबत नवाब मलिक यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर आणावेत, असे आव्हानही भारतीय यांनी नवाब मलिक यांना दिले.

तसेच ड्रग्स माफियांसोबत आपला कुठलाही संबंध नाही. आपण एक व्यावसायिक असून आपल्या मालकीचे एकूण 22 हॉटेल्स आहेत. मात्र, नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते आपल्यावर उलटसुलट आरोप करत आहेत. याउलट नवाब मलिक यांनी तीन हजार कोटींची संपत्ती कशी मिळवली, याचा खुलासा त्यांनी करावा. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाबाबत आपण मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.