मुंबई - नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात देवीची कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करण्यात आली. शहरात देवीचे मोठ्या उत्साहात ढोलताशा,डीजे वाजत आगमन झाले. शहरात देवी बसतात त्याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आहे. पुढचे नऊ दिवस अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.
मुंबईत नवरात्रोत्सवाला सुरूवात, देवी मातेचे उत्साहात आगमन - नवरात्रोत्सव
डीपी वाडीची माऊली, सांताक्रूझची दुर्गा, धारावी सुभाषनगरची आई, कोळीवाडा येथील रेणुका देवी तसेच फोर्ट, अंधेरी, कुर्ला या परिसरातील नवरात्रौत्सव मंडळातील देवींचे आगमन झाले आहे.
मुंबई - नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात देवीची कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करण्यात आली. शहरात देवीचे मोठ्या उत्साहात ढोलताशा,डीजे वाजत आगमन झाले. शहरात देवी बसतात त्याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आहे. पुढचे नऊ दिवस अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.
नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून,मुंबईत आज काही घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात देवीची कुळाचाराप्रमाणे घटस्थापना झाली आहे.शहरात देवीच मोठ्या उत्साहात ढोलताशा ,डीजे वाजत आगमन झालेलं आहे. शहरात देवी बसतात त्याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली असून नऊ दिवस अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.
डीपी वाडीची माऊली, सांताक्रूझची दुर्गा , धारावी सुभाषनगरची आई, कोळीवाडा येथील रेणुका देवी तसेच फोर्ट ,अंधेरी,कुर्ला या परिसरातील नवरात्रौत्सव मंडळातील देवींचे आगमन आज झाले आहे. तसेच मुंबईमधील प्रसिद्ध महालक्ष्मी व मुंबादेवी मंदिर देखील नवरात्रौत्सवा निमित्ताने सजलेली आहेत.
मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच आज नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस असला तरी मुंबईतील अनेक मंडळांच्या देवींचे आगमन दरवर्षीप्रमाणे आज पहिल्या दिवशी
देखील सायंकाळ पर्यंत होणार आहे.
मुंबईतील देवींच्या मंदिरात दहा दिवस भाविकांच्या गर्दीचा ओघ असतो. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिस सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध भागात होणाऱ्या गरबा दांडिया उत्सवाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्थेसह पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.Body:.Conclusion:.