ETV Bharat / technology

Vodafone Idea च्या 5G सेवेचा भारतातील 17 शहरांमध्ये शुभारंभ, दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 5G सेवा सुरू - VODAFONE LAUNCHES 5G SERVICES

Vodafone Idea 5G service : Vodafone Idea नं भारतातील 17 शहरांमध्ये 5G सेवेचा शुभारंभ केलाय. कंपनीनं दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 5G सेवा सुरू केली आहे.

Vodafone Idea 5G service
Vodafone Idea 5G service (Vodafone Idea)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 18, 2024, 7:42 AM IST

हैदराबाद : Vodafone-Idea नं देशात 5G सेवा सुरू केलीय. मात्र ही सेवा भारतातील निवडक 17 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर व्होडाफोननं अखेर आपल्या ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे.

या 17 शहरांमध्ये मिळणार सेवा : Vodafone Idea नं मुंबई, दिल्ली,बेंगळुरू, कोलकाता, चेन्नईसह भारतातील 17 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीनं 3.3GHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँडवर 5G सेवा सुरू केली आहे. ताज्या अहवालानुसार, Vodafone Idea ची 5G सेवा देशातील 17 परवाना क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आली आहे. Vodafone Idea नं 3.3GHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँडसह 5G सेवा सुरू केली आहे. या 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी, Vi च्या प्रीपेड ग्राहकांना 475 रुपयांच्या प्लानसह रिचार्ज करावं लागेल. पोस्टपेड ग्राहकांना 1101 रुपयांच्या प्लानसह रिचार्ज करावं लागेल.

  • 1. दिल्ली-(ओखला इंडस्ट्रियल एरिया फेज 2, इंडिया गेट, प्रगती मैदान)
  • 2. कोलकाता- (सेक्टर-5 आणि सॉल्ट लेक)
  • 3. राजस्थान- जयपूर (गॅलेक्सी सिनेमा, मानसरोवर औद्योगिक क्षेत्र, RIICO)
  • ४. मुंबई-(वरळी, मरोळ अंधेरी पूर्व)
  • 5. महाराष्ट्र- पुणे (शिवाजी नगर)
  • 6. आंध्र प्रदेश – हैदराबाद (एडा उपल, रंगा रेड्डी)
  • 7. गुजरात- अहमदाबाद (दिव्य भास्कर जवळ, कॉर्पोरेट रोड, मकरबा, प्रल्हाद नगर)
  • 8. उत्तर प्रदेश पूर्व - लखनौ (विभूती खंड, गोमती नगर)
  • 9. उत्तर प्रदेश - आग्रा (जेपी हॉटेल जवळ, फतेहाबाद रोड)
  • 10. मध्य प्रदेश – इंदूर (इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स, परदेशीपुरा)
  • 11. बिहार- पाटणा (अनिशाबाद गोलांबर)
  • 12. पंजाब- जालंधर (कोट कलान)
  • 13. कर्नाटक- बेंगळुरू (डेअरी सर्कल)
  • 14. पश्चिम बंगाल- सिलीगुड़ी
  • 15. केरळ- (थ्रीक्काकडा, काकनाड)
  • 16. हरियाणा- कर्नाल (HSIIDC, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 3)
  • 17. पंजाब- जालंधर (कोट कलान)

5G सर्व्हिस पॅकची किंमत : किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, प्रीपेड वापरकर्त्यांना 5G कनेक्टिव्हिटीचा लाभ घेण्यासाठी 475 रुपयांचा पॅक रिचार्ज करावा लागेल. त्याच वेळी, पोस्टपेड वापरकर्त्यांना 5G कनेक्टिव्हिटीचा लाभ घेण्यासाठी REDX 1101 रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल.

हे वाचलंत का :

  1. Kia Syrosची अनधिकृत बुकिंग सुरू, 19 डिसेंबर रोजी Kia Syros जागतिक स्तरावर होणार लॉंच
  2. OnePlus 13 आणि OnePlus 13R 7 जानेवारी 2025 रोजी लॉंच होणार, सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर
  3. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बंपर भरती, 'इथं' करा थेट ऑनलाइन अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.