ETV Bharat / state

Navratri २०२३ : राज्यात नवरात्रीचा उत्सव; दांडिया खेळताना सुरक्षा बाळगा - मंगल प्रभात लोढा

Navratri २०२३ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Navratri 2023) पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र उत्सवाची धामधूम आहे. यानिमितातानं दांडिया आणि रास गरब्याचं आयोजन भव्य (Garba Dandiya In Navratri) प्रमाणात करण्यात येत आहे. राज्य सरकारच्यावतीनं तसेच स्थानिक महापालिकांच्या माध्यमातून याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, दांडिया खेळताना नागरिकांनी स्वतःही सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन, मुबंई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 7:15 PM IST

Mangalprabhat Lodha
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
प्रतिक्रिया देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : Navratri २०२३ : नवरात्रीत भव्य दुर्गापूजेचं (Navratri 2023) आयोजन करण्याबरोबरच गरबा आणि दांडिया खेळण्याचाही ट्रेंड आहे. विशेषता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गरबा आणि दांडिया नृत्य गुजरातच्या रस्त्यांवर तसेच इतरत्र देखील सर्रास पाहायला मिळते. मुंबईसह राज्यात तरूणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आनंद साजरा करतात. याबाबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील सर्व सण-उत्सव अतिशय धुमधडाक्यात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवादरम्यान कोणालाही कोणताही अडचणी येऊ नये, यासाठी राज्य सरकारच्यावतीनं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्थानिक महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबतच्या सुचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी : मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दांडियाचं आयोजन (Garba Dandiya) करण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. अशा वेळेस नागरिकांच्या आरोग्याची, सुरक्षेची सर्व काळजी सरकारनं घेतली आहे. मात्र, नागरिकांनी स्वतःही काळजी घ्यायला हवी. अनोळखी व्यक्तींना आपला संपर्क क्रमांक देवू नये, त्यांच्याकडील अन्न पदार्थ खावू नयेत, अशा सुचनाही देण्यात आल्याचं लोढा यांनी सांगितलं.

व्हॉईस ऑफ मिडियाला शुभेच्छा : व्हॉईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या संघटनेचे देशात सर्वाधिक सभासद अत्यंत अल्प काळात नोंदणी केल्याबद्दल, या संघटनेचे नाव इंडिया रेकॉर्डस या बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. यानिमित्तानं मुंबईत घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित लोढा यांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळात पत्रकारांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण मदत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा -

  1. ETV Bharat special story on garba : घरच्या घरी शिका दांडिया, गरबाच्या स्टेप्स; पाहा ईटीव्ही भारतची विशेष स्टोरी...
  2. Navratri 2023 : तुम्ही गरबा, दांडिया फक्त आनंदासाठी करता का? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...
  3. Navratri 2023 : नवरात्री म्हणताच आठवतात 'गरबा' आणि 'दांडिया'; जाणून घ्या काय आहे दोघांमधील नेमका फरक..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.