ETV Bharat / state

MH Covid Update : देशभरात आज कोरोना रुग्णालयांत मॉक ड्रील, राज्यात 'या' आठ जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण - Nationwide Mock Drill

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या 4578 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, पालघर, सातारा, सांगली या आठ जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona patient
कोरोना रुग्ण
author img

By

Published : Apr 10, 2023, 9:47 AM IST

Updated : Apr 10, 2023, 10:24 AM IST

मुंबई : राज्यात कोरोनाचे 788 नवीन रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. अशातच राज्यात सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयामध्ये मॉक ड्रील करण्यात येणार आहे. तर दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय व दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉक ड्रील करण्यात येणार आहे. राज्यात रविवारी 788 नवीन रुग्णांची तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात 4578 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 81 लाख 49 हजार 929 एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. 79 लाख 96 हजार 883 रुग्ण बरे झाले आहे. 1 लाख 48 हजार 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

'या' जिल्ह्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : राज्यात 4578 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामधील मुंबईत 1434, ठाणे 820, पुणे 747, नागपूर 328, रायगड 251, पालघर 120, सातारा 104, सांगलीत 110 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशव्यापी मॉक ड्रिलमध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही आरोग्य केंद्रे सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज झज्जर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मॉक ड्रिलची पाहणी करणार आहेत.

मॉक ड्रिल : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना रुग्णालयांना भेट देऊन मॉक ड्रिल पाहण्याची विनंती केली. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकार्‍यांसह तयारीचा आढावा घेण्याचा सल्लाही दिला होता. कोरोना चाचणींचे प्रमाण, लसीकरण वाढवणे आणि रुग्णालयांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा देण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना दिल्या आहेत.

61 नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी : जगभरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. म्हणून विमानतळावर कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत 17 लाख 58 हजार 405 प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. त्यापैकी 39 हजार 236 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 61 प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबईमधील 13, पुणे 12 तर नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा, नागपूर या जिल्ह्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

हेही वाचा : Corona Update : कोरोनाचा वाढता प्रसार; 'या' व्हेरियंटचा धोका सर्वाधिक

Last Updated : Apr 10, 2023, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.