ETV Bharat / state

Birla Insurance Company : महिलेला ९ कोटी रुपये देण्याचे राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून बिर्ला कंपनीला आदेश, काय आहे प्रकरण? - राष्ट्रीय ग्राहक आयोगाने आदेश पत्र केले जारी

Birla Insurance Company : राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून मुंबईतील एका महिलेला मेडिक्लेम नुकसान भरपाई पोटी नऊ कोटी रुपये देण्याचे नुकतेच आदेश देण्यात आले आहे. त्यामुळं हा निकाल अशा सर्व विमाधारकांना फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जातंय.

National Consumer Commission slaps Rs 9 crore on Birla Insurance Company
बिर्ला इन्शुरन्स कंपनीला राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा 9 कोटी रुपयांचा दणका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:59 PM IST

राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून महिलेला न्याय

मुंबई Birla Insurance Company : योगेश पारिख यांनी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स यांच्याकडून मेडिक्लेम विमा केला होता. 2014 साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी दीप्ती पारेख यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. मात्र विमा कंपनीने जन्मतारखेत फरक असल्यानं विमा नाकारला होता. दरम्यान, या प्रकरणी मूळ किंमत 4 कोटी रुपये आणि व्याजासहित 5 कोटी मिळून 9 कोटी रुपये या महिलेला देण्याचे आदेश नुकतेच राष्ट्रीय ग्राहक आयोगानं दिले आहेत. 20 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आयोगाकडून पत्र जारी करण्यात आले.

काय आहे प्रकरण : कांदिवली येथे योगेश पारिख आणि त्यांची पत्नी दीप्ती पारिख हे राहत असताना त्यांनी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स या कंपनीकडे वैद्यकीय विमा काढला होता. तेव्हा कंपनीनं योगेश यांची जन्मतारीख 1960 अशी नोंदवली. वस्तूतः योगेश यांचे सर्व जन्मदाखले आणि इतर शासकीय दस्ताऐवजामध्ये 1961 नमुद आहे. परंतु कंपनीनं जन्मतारीख नोंदवताना प्रीमियम आकारण्यात कंपनीला फायदा व्हावा, या उद्देशानं ती जन्मतारीख चुकीची नोंदवली, असा पीडित महिलेचा दावा होता. त्यामुळं या प्रकरणी पत्नी दीप्ती पारेख यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

नऊ कोटी रुपये दीप्ती पारिखला देणार : राष्ट्रीय ग्राहक आयोगानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. कंपनीनेच योगेश पारेख यांच्या वैद्यकीय विमासाठी तारीख चुकीची होती हे कंपनीला राष्ट्रीय ग्राहक आयोगात सिद्ध करता आलं नाही. महिलेचा दावा नाकारल्याबाबत मूळ चार कोटी रुपये आणि पाच कोटी रुपये व्याज असे एकूण नऊ कोटी रुपये दीप्ती पारेख यांना देण्याचे ग्राहक आयोगानं आदेश दिले.

विनोद सातपुते यांची प्रतिक्रिया : या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते, वकील विनोद सातपुते म्हणाले की, राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून मुंबईतील पीडित महिलेला मेडिक्लेम नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपये देण्याचे नुकतेच आदेश दिलेले आहेत. पीडित महिलेच्या मूळ जन्म प्रमाणपत्रावरची जन्मतारीख आणि मेडिक्लेम पॉलिसी कागदपत्रामध्ये जन्मतारीख ही जुळत नव्हती. कंपनीने तशी ती चुकीने नोंद केली होती. ही जन्म तारखेची तफावत आणि आधीची मेडिकल हिस्ट्री यामुळं कंपनीनं त्या पीडित महिलेला पाच कोटी रुपयांचा विम्याचा दावा नाकारला. मात्र ग्राहक आयोगानं तो दावा फेटाळून लावत त्या पीडित महिलेला न्याय दिला. नऊ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याच्या आदेश दिले. हा निकाल सर्व विमाधारकांना फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. Phalpik Bima Yojana: पंतप्रधान फळपिक विमा योजना अंतर्गत राज्यभर बोगस विमा प्रकरणे; पहा अशी होत आहे फसवणूक....
  2. Insurance Company Claim : कोरोना झाला नसूनही विमा कंपनीकडे क्लेम, सिडको एमआयडीसी पोलिसांत तक्रार
  3. पीकविमा कंपनीवर आर्थिक फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.