ETV Bharat / state

नसीरुद्दीन यांची प्रकृती उत्तम; सोशल मीडियावरील त्या बातम्या केवळ अफवा - नसीरुद्दीन शाह

नसीरुद्दीन यांचा मुलगा विवान शाहनेही टि्वट केले आहे. ' सगळे काही ठीक आहे. बाबा एकदम व्यवस्थित आहेत. त्यांच्या प्रकृतीवरून बोलल्या जात असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या अफवा आहेत. ते इरफानजी आणि चिंटूजी यांची आठवण काढत आहेत. त्यांनी दोन्ही परिवारांना आपल्या संवेदना जारी केल्या आहेत', असे विवान शाह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

नसीरुद्दीन यांची प्रकृती उत्तम; सोशल मीडियावरील त्या बातम्या केवळ अफवा

author img

By

Published : May 1, 2020, 6:07 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती बिघडली असल्याच्या बातम्या अचानक सोशल मीडियावर येत होत्या. शाह आजारी असल्याचा दावाही या बातम्यांमधून केला जात आहे. मात्र, हे सगळे खोटे असून ते ठणठणीत आहेत, अशी माहिती नसीरुद्दीन यांचे भाऊ जमीरउद्दीन शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

नसीरुद्दीन शाह आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. लोक शाह बरे व्हावे म्हणून प्रार्थनाही करू लागले होते. मात्र ही अफवा असून आमच्या दुश्मनांनी ही खोटी बातमी पसरवली आहे, असे नसीरुद्दीन यांचे भाऊ जमीरउद्दीन यांनी स्पष्ट केले. नसीरुद्दीन अगदी ठणठणीत असून मी रोज त्यांच्याशी फोनवरून बोलत आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याची बातमी खोटी आणि नुकसानदायी असल्याचे जमीरउद्दीन म्हणाले.

दरम्यान, यानंतर नसीरुद्दीन यांचा मुलगा विवान शाहनेही टि्वट केले आहे. ' सगळे काही ठीक आहे. बाबा एकदम व्यवस्थित आहेत. त्यांच्या प्रकृतीवरून बोलल्या जात असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या अफवा आहेत. ते इरफानजी आणि चिंटूजी यांची आठवण काढत आहेत. त्यांनी दोन्ही परिवारांना आपल्या संवेदना जारी केल्या आहेत', असे विवान शाह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.