ETV Bharat / state

Narendra Mehta Son Accident : भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या मुलाचा अपघात, महागड्या लॅम्बोर्गिनीचा चक्काचूर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 9:30 AM IST

Narendra Mehta Son Accident : भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाचा शनिवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या महागड्या लॅम्बोर्गिनी कारचही बरंच नुकसान झालंय.

Narendra Mehta Son Accident
नरेंद्र मेहतांच्या मुलाचा अपघात

मुंबई : Narendra Mehta Son Accident : भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा मुलगा तक्षिल मेहता याच्या लॅम्बोर्गिनी कारचा वरळी सी-लिंकवर अपघात झाला. या प्रकरणी १९ वर्षीय तक्षिल मेहता याच्या विरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. नरेंद्र मेहता मीरा-भाईंदर येथील भाजपचे माजी आमदार आहेत.

कारची रस्त्यावरील रेलिंगला धडक बसली : शनिवारी सकाळी हा अपघात झाला. तक्षिल मेहता याची महागडी लॅम्बोर्गिनी कार (क्रमांक MH 04 HQ 0711) वांद्रे - वरळी सी लिंक वरून भरधाव वेगाने जात होती. दरम्यान, त्याचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कारची रस्त्यावरील रेलिंगला जोरदार धडक बसली. अपघाताच्या वेळी पाऊस पडत होता. त्यामुळे कार रस्त्यावर स्किड झाली.

अपघातात कारचं बरंच नुकसान : या अपघातात तक्षिल याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच कारचं देखील बरंच नुकसान झालं. सुदैवानं अपघातात अन्य कोणीही जखमी झालं नाही. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपघातग्रस्त कार तेथून हलवून वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आली.

तक्षिल मेहताची मेडिकल चाचणी करण्यात आली : कार चालक तक्षिल मेहता यानं निष्काळजीपणे कार चालविल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. अपघातानंतर तक्षिल मेहता याची मेडिकल चाचणी करण्यात आली. मात्र तो नशेत नसल्याचं निर्दशनास आलंय. वरळी पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संविधान कलम २७९ आणि ३३६ अन्वये रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आलं.

हेही वाचा :

  1. Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत दोन मजली इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू
  2. Thane Accident News: भिवंडी वाडा महामार्गावरील अपघातात दोन तरुण गंभीर, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्याचा आरोप
  3. Palamu Accident : पलामूमध्ये कारने १२ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.