मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तपास केला जात आहे. या संदर्भात आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये एका कारवाईदरम्यान एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच अनुज केशवानी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील अमलीपदार्थ तस्करांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्स सिंडिकेट लक्षात आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कैजाण इब्राहिम या आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला सत्र न्यायालयाकडून 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. कैजाण इब्राहिमच्या चौकशीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या माहितीवरून अनुज केशवानीचे नाव समोर आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 590 ग्राम हाशिश, 664 एलसीडी पेपर, 304 ग्रॅम कॅप्सूल, 1अफू लाख 85 हजार रुपये यासह 5 हजार रुपयांचे इंडोनेशियन चलन जप्त करण्यात आले आहेत.एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल