मुंबई - सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सर्वच विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. उद्धव ठाकरे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, अशा भाषेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
तामिळनाडू अन् कर्नाटकात 52 टक्के आरक्षण
तामिळनाडू व कर्नाटकात 52 टक्के आरक्षण आहे. मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल ही नारायण राणे यांनी केला. राज्यात सर्व्हे करून आरक्षण देता आले असते, असेही नारायण राणे यांनी म्हटले. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यासाठी संपूर्णपणे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली.
हेही वाचा - कोरोनाचा फटका : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 40 टक्क्यांनी घसरली