ETV Bharat / state

सन आयलाय गो नारली पुनवेचा, मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी - मुंबई

वरळी आणि कफपरेड कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली गेली.

मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी
author img

By

Published : Aug 15, 2019, 1:56 PM IST

मुंबई - वरळी आणि कफपरेड कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली गेली. या सणाची तयारी महिनाभर आधी करण्यात येते. प्रत्येक कोळी बांधव या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र, यावेळी सामाजिक भान राखत कोळी बांधवानी पूरग्रस्तांचा विस्कटलेला संसार पुन्हा उभा राहू दे, असे नारळी पौर्णिमेला मच्छिमारांनी सागराला साकडे घातले.

मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काल (बुधवार) वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांनी सागराला सोन्याचा वर्ख लावलेला नारळ अर्पण केला. यावेळी कोल्हापूर, सातारा, सांगलीत जी भीषण पूरस्थिती निर्माण झाली त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

नऊपाटील जमात, गावकरी इस्टेट कमिटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वरळी कोळीवाडा येथून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी होड्यांना सजविण्यात आले होते. तर कोळी महिलांनी पारंपारिक पेहरावात सजून वाजत गाजत कोळी नृत्यावर मिरवणूक काढत वरळीच्या सागरी किनाऱ्यावर नारळ फोडून मच्छिमारांनी सागराची पूजा केली.

Intro:मुंबई

वरळी आणि कफपरेड कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली गेली. या सणाच्या आगमनाची तयारी महिनाभर आधी करण्यात येते. प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र यावेळी सामाजिक भान राखत कोळी बांधवानी पुरग्रस्तांचा विस्कटलेला संसार पुन्हा उभा राहू दे असे नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मच्छीमारांचे सागराला साकडे घातले.
Body:नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने बुधवारी वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांनी सागराला सोन्याचा वर्ख लावलेला नारळ अर्पण केला. यावेळी कोल्हापूर, सातारा, सांगलीत जी भीषण पूरस्थिती निर्मण झाली त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

नऊपाटील जमात, गावकरी इस्टेट कमिटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वरळी कोळीवाडा येथून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सागराला शांत होण्याचे आवाहन करण्यात आले.

मुंबईचा आद्य नागरिक असलेल्या कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा म्हणजे महत्वपूर्ण व आनंद उत्सवाचा सण. सागराला सोन्याचा नारळ अर्पण करायचा आणि वर्षभर मासळी मिळण्यासाठी प्रार्थना करायची.
यावेळी होड्याना सजविण्यात आले होते तर कोळी महिलांनी पारंपारिक पेहरावात सजून सवरून वाजत गाजत कोळी नृत्यावर वरळी कोळीवाड्यातून भव्य मिरवणूक काढत वरळीच्या सागरी किनाऱ्यावर नारळ फोडून मच्छिमारांनी सागराची पूजा केली.

पूरग्रस्त राज्यात रेस्क्यूसाठी कोळी बांधवाना पाठविण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी त्यांचे घर पुन्हा बहरण्यासाठी त्यांना मदत करावी असे आव्हान कै. माणिक धर्मा पाटील जमात ट्रस्टचे अध्यक्ष आणि नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनचे उपाध्यक्ष विजय वरळीकर यांनी केलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.