मुंबई - राज्यातील कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर असून एकीकडे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढे आली आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील नंदुरबार रेल्वे स्थानकावर या आयसोलेशन कोचचा वापर सुरू झालेला आहेत. आतापर्यंत 20 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबार रेल्वे स्थानकावर वापर सुरू
कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांकरिता भारतीय रेल्वेने मेल- एक्सप्रेसच्या 5 हजार प्रवासी डब्याचे आयसोलेशन कोचमध्ये रूपांतर केले होते. गेल्या वर्षी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर अनेक राज्यांनी केला. मात्र महाराष्ट्रात या आयशोलेशन डब्याचा वापर करण्यात आलेला नव्हता. कोरोनाची रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने उपाय योजनेची पावले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार रेल्वे स्थानकावर आयसोलेश कोचचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे नंदुरबार येथील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा रोखण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कुलरचीही करण्यात आली व्यवस्था रुग्णांना रेल्वेकडून 'या' सुविधा -पश्चिम रेल्वेकडून नंदुरबार रेल्वे स्थानकावर 22 आयसोलेश कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 21 कोचमध्ये 336 खाटांची सुविधा आहे. प्रत्येक कोविड रुग्णांसाठी एक बेड रोल, उशी, नॅपकिन कचऱ्याचा डबा देण्यात आले आहे. विशेष म्हणजे उन्हाळा असल्याने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एका डब्यात 9 कुलरची व्यवस्था केलेली आहे. तसेच रेल्वेच्या डब्यावर गोणपाट अंथरण्यात आलेला आहे. एका डब्यात दोन ऑक्सीजन सिलेंडर तर एका डब्यात एक बाथरूम तीन शौचालये सुविधा देण्यात आली आहे.ऑक्सिजनची करण्यात आलेली व्यवस्था महाराष्ट्रात इतके आहेत आयसोलेश कोच- सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण 386 आयसोलेश कोचेस आहेत. त्यापैकी 128 कोचेस मुंबई विभागात आहेत. तर मध्य रेल्वेकडे एकूण 48 कोचेस असून त्यापैकी 25 कोचेस मुंबई विभागात आहे. या सर्व कोचेसमधून जवळ जवळ एकाच वेळी 3 हजारहून अधिक कोरोना रुग्णाची सोय होऊ शकते. गेल्या वर्षी मध्य रेल्वेवर 482 आणि पश्चिम रेल्वेवर 410 आयसोलेशन कोच तयार केले होते. मात्र, त्यावेळी राज्य सरकारकडून आयसोलेश कोचची मागणी न केल्यास हे कोच पडून होते. तर यातील अनेक आयसोलेशन कोचेस परत सामान्य रेल्वे गाडीला लावण्यात आले होते.हेही वाचा-मुंबईत वाहनांसाठी कलर कोड लागू; नागरिक स्वतःही स्टिकर चिटकू शकतात, मात्र खोटी माहिती असल्यास कारवाई