ETV Bharat / state

Nanded Hospital Death Case : घटना दुर्दैवी, पण यंत्रणेचा दोष नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा

Nanded Hospital Death Case : नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 31 रुग्णांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या घटनेला रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 7:04 PM IST

Updated : Oct 3, 2023, 10:35 PM IST

माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : Nanded Hospital Death Case : नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 31 रुग्ण दगावल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर अहवाल समोर येईल. मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी पुरेसा औषधसाठा आणि डॉक्टर्स, कर्मचारी होते. त्यामुळं यंत्रणेचा दोष दिसत नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Nanded Hospital Death Case) यांनी केलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

रुग्णालयातील यंत्रणेचा दोष नाही : ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दोन दिवसात 31 रुग्ण दगावणं ही मोठी गोष्ट आहे. मात्र, या संदर्भात आम्ही सर्व आढावा घेतला आहे. प्राथमिक चौकशी केली असता, रुग्णालयामध्ये सर्व औषधे व्यवस्थित उपलब्ध आहेत. 127 प्रकारची औषधं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णालयाला बारा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळं निधीचीसुद्धा कमतरता नाही. तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टरसुद्धा रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यामुळं प्राथमिकदृष्ट्या तरी रुग्णालयातील यंत्रणेचा या घटनेमध्ये दोष दिसत नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

दुर्घटनेची चौकशी करणार : दरम्यान, नांदेड येथे घडलेल्या या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे प्रत्यक्ष रुग्णालयात भेटीसाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारीही आहेत. या घटनेची चौकशी करण्यात येईल, त्यानंतर चौकशी अंतिम अहवाल समोर येईल. त्यात जर कोणी दोषी आढळलं तर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

रुग्णांची अवस्था नाजूक : या ठिकाणी दगावलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध रुग्णांचा अधिक समावेश आहे. हे रुग्ण हृदयरोगाच्या व्याधीनं त्रस्त होते. तर काही लहान मुलं, जी दगावली आहे ती अत्यंत कमी वजनाची आणि दुर्बल बालकं होती. मात्र, तरीही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

म्हणून अजित पवार गैरहजर : उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले होते. अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठीसुद्धा गेले नव्हते. त्यामुळं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार यांची प्रकृती ठीक नाही. त्यांच्या गळ्याला त्रास होत आहे. त्यांना बोलता येत नाही. त्यामुळं ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. बाकी कुठल्याही चर्चा आणि अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नका.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray : 'शासकीय रुग्णालय' मृत्यूचा सापळा बनलाय का? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
  2. Nanded Patient Death Case : रुग्णालयात मृत्यूचं तांडव, सत्ताधारी खासदारानं रुग्णालयाच्या डीनला साफ करायला लावलं शौचालय
  3. Ghati Hospital Death Case : नांदेडनंतर संभाजीनगरच्या 'घाटी' रुग्णालयात मृत्यूचं तांडव, २४ तासात १८ रुग्ण दगावले

Last Updated : Oct 3, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.