मुंबई - आज अनंत चतुर्थीनिमित्त भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत असून सकाळपासूनच गिरगाव चौपाटी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. सकाळी घरगुती बाप्पांचे मोठ्या प्रमाणात विसर्जन झाले तर, दुपारनंतर गर्दीत आणखी वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो किलो निर्माल्य जमा होणार आहे. या निर्माल्याची विल्हेवाट लावायचा मोठा प्रश्न महापालिकेपुढे असतो.
दरवर्षी गणपती विसर्जनानंतर महापालिकेला प्रश्न पडतो की या जमा होणाऱ्या फुलांच्या निर्माल्यावर कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची. मात्र, यावेळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रशासनाच्या मदतीला धावून आली आहे. ते जमा होणाऱ्या निर्माल्यापासून प्रतिष्ठान गांडूळखत निर्मिती करणार आहे. या उपक्रमासाठी 1000 स्वयंसेवक प्रतिष्ठानमार्फत तैनात करण्यात आले आहेत. यात स्वयंसेवकामार्फत निर्माल्य जमा करण्याचे आणि फुल आणि दोरा वेगळा करण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्यावर्षीही प्रतिष्ठान मार्फत संजय गांधी नॅशनल पार्क येथे हा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदाही त्यांनी गिरगाव आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उपक्रम राबवला आहे.
हेही वाचा - गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात