मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावे, अशी मागणी माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली होती. हे प्रकरण ताजे असताना, आता बाळासाहेब थोरात आणि पटोले यांच्यात धुसफूस वाढली आहे. पटोले यांच्या नेतृत्वाखाली काम न करण्याची भूमिका थोरात यांनी घेतली आहे. काँग्रेसमध्ये दिवसागणिक वाढलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील येत्या १२ आणि १३ फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी साडेचार वाजता सीपीएल नेत्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता 'हात से हात जोडो' या एमपीसीसी तर साडेसहाला एमआरसीसीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक होणार आहे.
तांबे बाळासाहेब थोरात यांचे भाचे : तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलेले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी थोरात यांनी पटोले यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत गटनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवला. हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील वादावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर तोडगा निघतो का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आघाडीची पटोलेंवर टीका : काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने ही नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून निशाणा साधला आहे. पटोले यांच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे सत्ता पालट झाली. असा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला. काँग्रेसकडून या आरोपांना प्रत्युत्तर देताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेने राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हा वाद आता मिटतो का, पाहणे महत्त्वाचे आहे.
राहुल गांधी यांनी मोदींनी धारेवर धरले : संसदीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी आदानीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहेत. राहुल गांधी यांच्या आक्रमक पवित्राने पंतप्रधान मोदी यांची चांगलीच कोंडी झाली. राहुल गांधी यांच्यामुळे पक्षातील मरगळ झटकत असतानाच नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलेले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी थोरात यांनी पटोले यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत गटनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवला. हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.
हेही वाचा : Atul Londhe On Nana Patole : नाना पटोलेंचा तो राजीनामा काँग्रेस अध्यक्षांच्या सुचनेनुसारच - अतुल लोंढे