ETV Bharat / spiritual

मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार; महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं का नाही?, घ्या जाणून - MARGASHIRSHA GURUVAR 2024

मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी (last Margashirsha Guruvar 2024) महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करण्यात येतं. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार 26 डिसेंबरला आहे.

Margashirsha Guruvar 2024
मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

हैदराबाद : कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरु होतो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणं मार्गशीर्ष महिन्यालाही आधिक महत्व आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं. तसंच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत (last Margashirsha Guruvar2024) केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रतामुळं भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून माहिला महालक्ष्मीची पूजा करून उपास करतात.

पूजा कशी करावी? : गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी-कुंकू लावा. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी टाका. कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर महालक्ष्मीचा फोटो ठेवा. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य दाखवा आणि आरती करा.

महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं का नाही? : मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं. परंतु, या वर्षी शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी (Ekadashi) आली आहे. त्यामुळं उद्यापन करावं की नाही?, सुवासिनीला जेवण्यास कसं बोलवावं? असे अनेक प्रश्न माहिलांना पडले आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रत आणि एकादशी हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे. दोन्हींचा काहीही संबंध नाही. त्यामुळं उद्यापन अवश्य करावं. ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावं. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवा. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांनी पूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे.

गुरुवारचं उद्यापन आणि शुभ मुहूर्त (Margashirsha Guruvar Shubh Muhurta) : शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदीकुंकू केल्यास काहीही फरक पडणार नाही. मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा करण्याचा ब्रह्म मुहूर्त हा सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत आहे. तर अमृत काळ सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, तर विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे.

(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)

हेही वाचा -

यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.