ETV Bharat / state

INDIA Meeting in Mumbai: 'इंडिया'च्या बैठकीत महाविकास आघाडीत 'अशी' असणार जबाबदारीची विभागणी - देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी

देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी 'इंडिया'ची मुंबईत बैठक होण्यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत गुरुवारी झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

NDIA meeting in Mumba
नाना पटोल न्यूज
author img

By

Published : Aug 18, 2023, 11:05 AM IST

Updated : Aug 18, 2023, 2:28 PM IST

मुंबई- केंद्रातील भाजपाच्या सत्तेला दूर करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या तयारीसंदर्भात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी राज्यातील येड्यांच्या सरकारचा समन्वय नसल्याने जनता त्रस्त असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

असे असणार इंडिया बैठकीचे नियोजन- मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. भाजपा विरोधातील देशातील 26 पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहे. आयोजनाची मुख्य जबाबदारी ठाकरे यांच्याकडे आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांची स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून 31 ऑगस्टला डिनर तर 1 सप्टेंबरला काँग्रेसकडून नेत्यांना लंच दिले जाणार आहे.

ज्याची त्याची जबाबदारी ठरली - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आणि आम्ही सर्व उपस्थित होतो. महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपापल्या जबाबदारीसंदर्भात चर्चा केली. संपूर्ण देशांमधून सात राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांचे स्वागत योग्य प्रकारे करता येईल, याची काळजी घ्यावी लागेल.

केंद्रातील 'तानाशाह' सरकार उलथून लावण्याचा आवाज मुंबईच्या 'इंडिया' आघाडीची बैठकीमधून संपूर्ण देशाला जावा, अशा पद्धतीची योजना बैठकीत ठरली. - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

'येड्या' सरकारमुळे जनता त्रस्त- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शासकीय स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर नाना पटोले म्हणाले की, यापूर्वी राज्यात 'ईडीचे सरकार' होते. आता 'येड्यांचे सरकार' आले आहे. सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे राज्याचे आणि राज्यातील जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या येड्या सरकारमुळे जनता त्रस्त आहे.

हे नेता बैठकीला होते उपस्थित- माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र वर्मा, आदिती नलावडे, डॉ. राजू वाघमारे आदि नेते 'मातोश्री' येथील बैठकीला उपस्थित राहिले.

हेही वाचा-

  1. Nana Patole On Modi : लाल किल्ल्यावरून तरी खोटे बोलू नका, नाना पटोलेंचा मोदींना टोला
  2. Nana Patole on VBA : महाविकास आघाडीत सहभागासाठी 'वंचित'चा प्रस्ताव? नाना पटोले म्हणाले...

Last Updated : Aug 18, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.