ETV Bharat / state

Nana Patole on BJP : भाजपकडून काँग्रेसला बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न - नाना पटोले

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावरून कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर पत्रकार परिषेदत प्रतिक्रिया दिली आहे. भाजपवर थेट निशाणा साधत काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पटोलेंनी केला. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Nana Patole on BJP
नाना पटोले
author img

By

Published : Feb 10, 2023, 1:30 PM IST

Updated : Feb 10, 2023, 3:02 PM IST

मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील कलह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या वादावरून नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. आताच झालेल्या विधान परिषदेत निवडणुकीत भाजपला आलेले अपयश हे ते पचवू शकले नाहीत, म्हणून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला आहे.

विधान परिषदेतील पराभव जिव्हारी : नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपकडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न सर्वत्र सुरू आहे. काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश प्राप्त झाले आहे. काँग्रेसला यामुळे बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राजीनाम्यावर काय म्हणाले पटोले ? : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला की नाही हे अद्याप माहीत नसल्याने यावर मी बोलणार नाही. तसेच या विषयावर चर्चाही करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचे १० ते १५ आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोणाच्या वक्तव्यावर चर्चा करण्याचे काही कारण नाही, अशा अनेक चर्चा होत असतात.

जनतेच्या प्रश्नांवर पंतप्रधान बोलत नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याविषयी पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मात्र, प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती बोलत नाहीत. लोकसभेत राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली नाहीत. गौतम अदानींवर ते बोलत नाहीत. लोकसभेत पंतप्रधान यांनी बोलायला हवे व देशातील संभ्रम त्यांनी दूर केला पाहिजे, असेही नाना म्हणाले. जे मुद्दे राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत त्यावर उत्तर त्यांनी द्यावे तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यावर सुद्धा पंतप्रधान काही बोलत नाहीत हे दुर्भाग्य असल्याचे नाना म्हणाले. भराडी देवीच्या यात्रेला जाऊन मुंबई मनपा बाबत मुख्यमंत्री बोलतात. परंतु मुंबईत घेतलेल्या सभेला लोक जमत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच मुंबईत झालेल्या सभेत पैसे देऊन लोक आणले असेही ते म्हणाले.

अप्रत्यक्षपणे ठाकरे यांना टोला : सामनाच्या अग्रलेखातून नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावरून आरोप करण्यात आले होते. त्याविषयी बोलताना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी मला इतके शक्तिशाली समजले. जर मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार पडले नसते. माझ्या शक्तीचा परिचय त्यांनी देशाला करून दिला. परंतु महाविकास आघाडीचे नेतृत्व जे करत होते, ते कमी पडत होते का ? हा प्रश्न देखील निर्माण होतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा : Kasba By Poll Election: मला मुस्लिम मतांची गरज नाही, हिंदूंच्या मतांवर विजयी होणार- आनंद दवे

Last Updated : Feb 10, 2023, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.