ETV Bharat / state

Garib Rath Express News : नागपूरहून निघालेली गरिब रथ एक्स्प्रेस पुण्याला पोहोचलीच नाही; प्रवाशाच्या पत्नीचा दावा

Garib Rath Express News t: नागपूरहून काल 24 सप्टेंबर रोजी गरीब रथ एक्सप्रेस पुण्याला निघाली; परंतु ती आज पुण्याला पोहोचलीच नाही. त्यामुळे (Garib Rath Express) मनमाड या मध्य रेल्वेच्या स्थानकातून (Manmad Railway Station) ती औरंगाबाद आणि लातूर या मार्गे मध्यरात्री किंवा उद्या पुण्याला पोहोचेल, असे प्रवाश्याना सांगितले. (Garib Rath Express at Aurangabad) मात्र, यामधील हजारो ज्येष्ठ नागरिक महिला आणि बालके यांचे मात्र अतोनात हाल झाले.

Garib Rath Express Lost
गरिबरथ एक्सप्रेस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 10:18 PM IST

Updated : Sep 25, 2023, 11:03 PM IST

रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणावर ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीची प्रतिक्रिया

मुंबई Garib Rath Express News : नागपूर या रेल्वे स्थानकातून काल गरीब रथ एक्सप्रेस निघाली. हजारो प्रवाशांना घेऊन धावली. मात्र मध्य रेल्वेच्या मनमाड रेल्वे स्थानकापासून तिने दुसरा मार्ग धरला. जोरात धावणारी गरीब रथ औरंगाबादच्या दिशेने धावू लागली. प्रवाशांना समजलेच नाही की गाडी पुण्याला पोहोचते आहे की कुठे? असा प्रश्न आतील सर्व प्रवाशांना पडला.

ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडली: मनमाड या मध्य रेल्वेच्या जंक्शन रेल्वे स्थानकातून गरीब रथ एक्सप्रेस औरंगाबादला निघाली. वाटेतच छोट्या रेल्वेस्थानक असलेल्या परंतु तिथे कुठे थांबाही नाही अशा ठिकाणी ती थांबली. एक ते दोन तास इतका वेळ तिथे गरीब रथ एक्सप्रेस थांबली. त्यामुळे प्रवाशांना पाणी आणि जेवण्यासाठी अन्नही मिळेना. नाश्त्यासाठी पॅकेजिंग असलेलं फूड देखील तिथे मिळेना अशी स्थिती झाली. या संपूर्ण ट्रेनमध्ये हजारो प्रवासी होते. त्यापैकी श्रीकांत वसंत वैद्य हे ज्येष्ठ नागरिक यांची तब्येत बरी नसल्यामुळे ती अधिकच बिघडली.

तर रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार: यासंदर्भात पुण्यातील कोथरूड या परिसरातील गणेश नगर भागात राहणारे वसंत वैद्य त्या ट्रेनमध्ये सध्या आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना वसंत वैद्य यांच्या पत्नी ऋचा वैद्य यांनी सांगितले की, कालची सायंकाळी 6 वाजण्याची गाडी नागपूर येथून निघाली. परंतु पुण्याला ती निश्चित वेळेत पोहोचली नाही. जर पूर्वनियोजन रेल्वेने केलं होतं तर जेथे थांबा नाही अशा रेल्वेच्या अत्यंत छोट्या स्थानकात गाडी थांबवली. यावर तेथे खाण्या-पिण्याची आणि लाईट गाडीत असण्याची व्यवस्था असायला हवी होती. माझे पती वसंत वैद्य हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना प्रवासात औषधे अनिवार्य असतात. परंतु रेल्वे अशा ठिकाणी थांबली की पाणीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. उद्या त्यांचं जर काही कमी जास्त झालं. तर याला रेल्वे जबाबदार असेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

म्हणे, गाडी पाच तासांनी पुण्याला पोहोचेल: या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मानसपुरे हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, गाडीचे पूर्व नियोजन केलं होतं. दोन लाईन पुणे रेल्वे मार्गावर टाकण्यासाठी गाडी वळवली गेली. परंतु आम्ही सर्व रेल्वे स्थानकांवर व्यवस्था केलेली आहे. अत्यंत छोट्या जेथे रेल्वे थांबा नाही अशा रेल्वे स्थानकावर गाडी थांबली. सगळ्या ठिकाणी व्यवस्था केली आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. रेल्वे पाच तासानंतर पुण्यामध्ये पोहोचेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा:

  1. Naeem Khan Murder : गोबरवाई येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ मोक्का आरोपी नईम खान याची गोळ्या झाडून हत्या
  2. Robbery In Jammu Tawi Express : संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत अनेक प्रवासी जखमी
  3. Railway Services Disrupted : नर्मदा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, रुळावर पाणी आल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated : Sep 25, 2023, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.