ETV Bharat / state

व्हॉल्व असलेला एन 95 मास्क वापरताय...मग हे वाचाच

author img

By

Published : Jul 21, 2020, 5:38 PM IST

एन 95 मास्क, थ्री लेअर सर्जिकल मास्क, एन 95 व्हॉल्व मास्क, कॉटन मास्क असे अनेक प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. एन 95 मास्क आणि एन 95 व्हॉल्व मास्क हे डॉक्टर तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरावे, असा अलिखित नियम आहे. मात्र सुरुवातीपासूनच हे मास्क सर्वसामान्यही वापरताना दिसत आहेत.

n95-mask
एन 95 मास्क

मुंबई- कोरोना व्हायरसपासून बचावाचे पहिले शस्त्र म्हणजे मास्क आहे. परंतु, हा मास्क कसा आणि कोणत्या प्रकारचा असावा हे माहिती असेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण व्हॉल्व असलेले एन 95 मास्क कोरोना संसर्ग रोखण्यात अयशस्वी झाला असल्याचा दावा काही डाॅक्टरांनी केला आहे. दिसण्यासाठी आकर्शक असणारा हा मास्क नागरिकांना खरेदी करताना अधिक भावतो. त्यामुळे सर्रास त्याची खरेदी केली जाते. मात्र, हा मास्क वापरणे धोक्याचे असून त्याचा वापर तत्काळ बंद करावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केले आहे.

एन 95 मास्क, थ्री लेअर सर्जिकल मास्क, एन 95 व्हॉल्व मास्क, कॉटन मास्क असे अनेक प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. एन 95 मास्क आणि एन 95 व्हॉल्व मास्क हे डॉक्टर तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरावे, असा अलिखित नियम आहे. मात्र सुरुवातीपासूनच हे मास्क सर्वसामान्यही वापरताना दिसत आहेत. मिशन बिगिन अगेन नंतर आता मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असल्याने व्हॉल्व मास्कही अधिक वापरला जात आहे. मात्र हाच मास्क आता इतरांसाठी धोक्याचा ठरत आहे. या मास्कमुळे बाहेरचे जंतू आत येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. पण या मास्कमधून मास्क वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील जंतू मात्र बाहेर फेकले जातात. अशावेळी जर व्हॉल्व मास्क वापरणारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता वाढते, असे डॉ.अनिल पाचणेकर यांनी सांगितले.

आम्ही कोरोनाच्या काळात अगदी सुरुवातीपासून एन 95 व्हॉल्व मास्क वापरू नका, ते केवळ डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच आहेत, असे आवाहन करत आहोत. मात्र त्यानंतरही या मास्कचा वापर वाढताना दिसत आहे. दरम्यान केंद्र सरकारनेही महिन्याभरापूर्वीच सर्वसामान्यांना हा मास्क वापरण्यास बंदी केली आहे. पण तरीही हा मास्क वापरला जात आहे. हा मास्क आतले जंतू बाहेर फेकत असल्याने जर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मास्क वापरत असेल तर त्याच्या शिंकण्यातून, खोकण्यातून कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे हा मास्क वापरणे धोक्याचे आहे, असे आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

दरम्यान, डॉक्टर 8 ते 10 तास रुग्णांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना तितके तास मास्क, पीपीई किट वापरावे लागते. अशात त्यांना गुदमरल्यासारखे होऊ नये यासाठी डॉक्टरांकडून एन 95 व्हॉल्व मास्कचा वापर केला जातो. पण सर्वसामान्यांनी हा मास्क वापरणे कधीही धोकादायकच आहे, असे डॉ. पाचणेकर यांनी स्पष्ट केले आहे. तर काही आरोग्य चळवळीतील तज्ज्ञांनी तर मुळावर घाव घालावा असे म्हणत या मास्कच्या विक्री-उत्पादनावरच बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मुंबईकर मास्क वापरत आहेत. पण मास्क वापरताना कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. तर मास्कची विल्हेवाटही लावताना दिसत नाहीत, असे डॉ. पाचणेकर म्हणतात. कोणताही मास्क हा दिवसात 4 तासच वापरावा हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम. पण याबाबत लोकांना माहीतीच नाही. त्यामुळे अनेक जण दिवसभर कायम तीन-तीन, चार-चार दिवसही तोच मास्क न धुता वापरताना दिसतात. जर तुम्ही एन 95 मास्क चार तास वापरत असाल तर चार तासानंतर तो प्लॅस्टिकच्या पिशवीत सुकायला टांगून ठेवावा. हा मास्क चार दिवसानंतर पुन्हा वापरता येईल. पण अशाप्रकारे केवळ चार वेळेसच हा मास्क वापरता येईल. त्यानंतर मात्र तो कापून वा जाळून त्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे, असेही डॉ. पाचणेकर सांगतात.

थ्री लेअर सर्जिकल मास्क असेल तर तो 4 तासाने काढून तो पिशवीत घट्ट बांधून कचऱ्याच्या डब्यात टाकावा. असाच रस्त्यावर वा कचऱ्याच्या डब्यात टाकू नये, अन्यथा सर्वसामान्य आणि त्यातही सफाई कामगारांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तर कॉटन मास्कही चार तासच वापरुन तो डेटॉलमध्ये स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवूनच वापरावा असेही ते सांगतात. महत्त्वाचे म्हणजे मास्क घालून बाहेर गेल्यानंतर मास्कला आणि चेहऱ्याला हात लावायचाच नसतो. तरीही लोकं सारखे मास्क-चेहऱ्याला हात लावतात आणि त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत. तेव्हा मुंबईकरांनो सर्वात आधी व्हॉल्व मास्क वापरणे आधी बंद करा, आणि मास्क वापराबाबतचे सर्व नियम पाळा आणि कोरोनापासून बचाव करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.