ETV Bharat / state

Sharad Pawar Photo Permission : परवानगीशिवाय फोटो वापरू नका; शरद पवारांची थेट तंबी

राष्ट्रवादीसोबत अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे यावर अजूनही स्पष्टता नाही. शरद पवार यांचा फोटो वापरण्याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. आता परवानगी घेऊनच शरद पवार यांचा फोटो वापरता येणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 4, 2023, 4:56 PM IST

Updated : Jul 4, 2023, 5:56 PM IST

मुंबई - माझ्या विचारांशी द्रोह केलेल्यांसोबत माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे यापुढे माझा फोटो वापरताना माझी परवानगी घेणे गरजेचे असल्याचे ऑफ द रेकॉर्ड बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

शरद पवारांची तंबी : मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, अशी थेट तंबीच शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना दिली आहे. त्यामुळे आता बंड केलेल्या नेत्यांना शरद पवार यांचा फोटो वापरता येणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तरीही अजित पवार आणि त्यांचे बंड केलेले सहकारी शरद पवार यांचा फोटो वापरणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

  • Those who don't accept Sharad Pawar as their leader should not use his photo: NCP spokesperson Mahesh Tapase on Sharad Pawar's photo at Ajit Pawar faction's office pic.twitter.com/g0qkbIvXKZ

    — ANI (@ANI) July 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवीन कार्यालयात शरद पवारांचा फोटो - राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाचे मुंबईत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले. या कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतरच शरद पवार यांनी आपला फोटो वापरण्याबाबत तंबी दिली असल्याचे बोलले जात आहे.

  • NCP working President Praful Patel's photo frame removed from the Nationalist Student Congress office in Delhi.

    "We removed Praful Patel's photo frame and all other leaders who left NCP since they are not part of the NCP family anymore...," says NCP student wing national… pic.twitter.com/A0WWHg3zOt

    — ANI (@ANI) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जे शरद पवार यांना नेता मानत नाहीत त्यांनी शरद पवार यांचा फोटो वापरू नये - राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे

अजित पवार, प्रफुल्ल पटेलांचे फोटो हटवले - राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड केले अन् राजकारणात मोठा भूकंप आला. यानंतर शरद पवार यांचे समर्थक आक्रमक झाले होते. राज्यातील विविध भागात शरद पवार समर्थकांनी अजित पवार यांच्या बंडाचा निषेध केला. तसेच पुणे, ठाणे, नाशिक, अकोला यासह विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावलेले अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. याबरोबर बंड करून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या अन्य 8 नेत्यांचेही फोटो राष्ट्रवादी कार्यालयातून हटवण्यात आले आहेत.

  • VIDEO | "Now he (Praful Patel) isn't part of our family, so we have to remove his photo; now the new family will keep his photo," says NCP students' wing national president Sonia Doohan on removal of NCP working president Praful Patel's photo from party office. pic.twitter.com/o5HYyPRyJU

    — Press Trust of India (@PTI_News) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : 'देशाला मोदींशिवाय पर्याय नाही', पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
  2. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कोणाची? खरा प्रतोद कोण? विधानसभा अध्यक्ष म्हणतात...
  3. Jayant Patil Taunt Ajit Pawar: आमची 'नॅशनॅलिस्ट' त्यांची 'नोशनल' पार्टी - जयंत पाटील

Last Updated : Jul 4, 2023, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.