मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. लतादीदींच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने लता दीदींना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 'लतांजली' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे, शरयू दाते, निरुपमा डे, स्वप्नपदा गोस्वामी आपल्या गायनातून लतादीदींच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे यात मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने देखील आदरांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक : लतांजली कार्यक्रमाचे आयोजन भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले होते. आमदार आशिष शेलार म्हणाले की, साधारण 14 ते 15 दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यांनी लगेचच मी नक्की येईन असे सांगितले. आणि त्यांनी मी लतादीदींसाठी कार्यक्रम आहे म्हणून मी येतो असे मला सांगितले. हे असे मुख्यमंत्री आहेत की जे रात्री तीन वाजेपर्यंत काम करत असतात. तुम्ही लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाचे चर्चा ऐकत आहे पण या विद्यापीठाच्या मंजुरीसाठीचे प्रस्तावावर अंतिम मंजुरी वर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आणि हे विद्यापीठ आता पुढच्या काही दिवसांमध्ये सत्यात उतरत आहे, हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
रवींद्र नाट्यगृहात संगीताचे वर्ग : लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्य आदिनाथ मंगेशकर म्हणाले की, लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि विद्यापीठातला परवानगी मिळाली. या विद्यापीठाच्या कामाला आता काही दिवसात सुरुवात होईल. मात्र, सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे संगीत महाविद्यालय सुरू झाले असून, रवींद्र नाट्यगृहात याचे वर्ग भरतात. ज्याप्रमाणे मॅनेजमेंट शिकायचे असेल तर सर्व जण हॉवर्ड विद्यापीठाला पहिले प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला संगीत शिकायचे असेल तर सर्व लोक लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाने विद्यापीठाला प्राधान्य देतील, अशा स्वरूपाचे आम्ही या महाविद्यालयात काम करू, असे आश्वासन देखील आदिनाथ मंगेशकर यांनी दिले.
81 वर्ष संगीत क्षेत्रात कार्यरत : पुढे बोलताना आदिनाथ मंगेशकर म्हणाले की, लता मंगेशकर ह्या एक अशा व्यक्तिमत्व होत्या ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच दिवस शाळेत गेल्या. ज्या शाळांमध्ये तुम्ही शिकता. मात्र, कोणतीही भाषा न शिकता त्यांनी तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यामध्ये इंग्रजी पासून रशियनपर्यंत तर आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. सोबतच त्यांच्या नावाने आणखी एक रेकॉर्ड आहे तो म्हणजे त्यांनी तब्बल 81 वर्ष संगीत क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. हा रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे. त्यामुळे असे दोन रेकॉर्ड लतादीदींच्या नावावर आहेत जे सहसा कुणाला माहीत नाहीत.
प्रशासन सहकार्य करेन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या आवाजाचे जगभरात चहाते आहेत. हे सर्व लोक धर्म, देश, भाषा, प्रांत विसरून फक्त लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर प्रेम करतात. मंगेशकर घराण्याने खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राची सेवा केली आहे. त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाच कला आणि सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आशिष शेलार म्हणाले लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या प्रस्तावावर अंतिम स्वाक्षरीने केली. पण, मी फक्त एक निमित्त आहे. कारण त्यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे. लतादीदींच्या नावाचे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आपण कलिनामध्ये करत आहोत. त्याला प्रशासन म्हणून मी कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. यासोबतच मीरा-भाईंदर मध्ये भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाची निर्मिती देखील आपण केलेली आहे. या नाट्यगृहाची क्षमता तब्बल 1000 प्रेक्षक बसतील इतकी आहे. या नाट्यगृहाचे देखील लोकार्पण लवकरच करण्यात येईल.
संगीत कलाकार-अभिनेत्रींची उपस्थिती : लता मंगेशकर यांच्या या पहिल्या मृतदेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात तब्बल 50 संगीत कलाकारांनी व 12 अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती. यात गायक, वादक असे एकूण 50 संगीत कलाकार व रेखा ते काजोल अशा एकूण 12 अभिनेत्रींचे उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यात 70 ते 80 च्या दशकात ज्या अभिनेत्रींना त्यांच्या चित्रपटासाठी लतादीदींचा आवाज लाभला अशा अभिनेत्रींची उपस्थिती होती. या अभिनेत्रींनमध्ये हेमा मालिनी, रविना टंडन, मौसमी चॅटर्जी, आशा पारेख, रीना रॉय, नितु सिंग यांसह अन्य अभिनेत्री उपस्थित होत्या.
दिदींचा अखेरचा दंडवत : 6 फेब्रुवारी 2022 रोजी लतादीदींचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. लता दीदींचे निधन होऊन एक वर्ष झाले असले तरी त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. अनेक दशके आपल्या आवाजाने संगीत जगतावर अधीराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय गाणी दिली आहेत. मात्र, वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
अजरामर लतादीदी : आपल्या जादुई आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या गान कोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत जवळपास 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 50,000 हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. लतादीदींनी दिलेल्या गाण्यांमुळे अनेक चित्रपट हिट झाले. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. आजही त्यांची गाणी तितक्याच आवडीने आणि प्रेमाने ऐकली जातात. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या आवाजाचे चाहते आजही आहेत.
हेही वाचा : Lata Mangeshkar Death anniversary : लता मंगेशकर यांची प्रथम पुण्यतिथी, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन