ETV Bharat / state

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची १५ हजार कोटींची थकबाकी; वसुलीची मागणी

लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. पालिकेला महसूल मिळत नसताना मालमत्ता कराची तब्बल १५ हजार कोटींची थकबाकी विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय, तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांकडे थकीत आहे. त्यापैकी टॉप ५० थकबाकीदारांकडे १ हजार ६८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

author img

By

Published : Jan 9, 2021, 4:52 PM IST

mumbai Property Tax Recovery
मुंबई पालिका मालमत्ता कर वसुली

मुंबई - लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. पालिकेला महसूल मिळत नसताना मालमत्ता कराची तब्बल १५ हजार कोटींची थकबाकी विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय, तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांकडे थकीत आहे. त्यापैकी टॉप ५० थकबाकीदारांकडे १ हजार ६८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही थकबाकी प्रशासनाने त्वरित वसूल करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली.

माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव व विरोधी पक्ष नेते रवी राजा

पालिकेचा महसूल -

जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत नागरिकांना महापालिकेकडून सोयी सुविधा पुरावल्या जातात. त्याबदल्यात पालिकेकडून पाणी, मालमत्ता आदी कर वसूल केले जातात. नागरिक आणि व्यावसायिकांकडून भरण्यात येणाऱ्या करामधून पालिकेला महसूल मिळतो. त्यातून पालिका नागरिकांना सोयी सुविधा पुरवते. मात्र, मुंबईमध्ये काही बड्या व्यावसायिक, बिल्डर आणि सरकारी कार्यालयांकडून पालिकेचे कर भरलेच जात नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- मुंबईतील स्मशानभूमी प्रदुषणविरहीत करण्यासाठी पालिकेचे नवे धोरण

मालमत्ता कर -

मुंबई महापालिकेला सर्वात मोठा महसूल जकात करामधून मिळत होता. जकात कर रद्द झाल्यावर पालिकेला मालमत्ता करातून सर्वात जास्त महसूल अपेक्षित आहे. मात्र, मालमत्ता कराची तब्बल १५ हजार कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यातील टॉप ५० थकबाकीदारांकडे तब्बल १ हजार ६८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. तसेच, महापालिकेच्या २४ विभागातही टॉप ५० थकबाकीदारांची यादी काढण्यात आली आहे. त्यात एकूण ४ हजार ४५०.७९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेची बड्या लोकांकडे शहर विभागात १ हजार ५०६ कोटी, पूर्व उपनगरात ६८६ कोटी, तर पश्चिम उपनगरात २ हजार २५७ कोटी रुपये थकाबकी आहे.

थकबाकी त्वरित वसूल करावी -

मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यातच पालिकेचा महसूल वसूल केला जात नाही. यामुळे पालिका आर्थिक टंचाईला सामोरे जाऊ शकते. यामुळे ही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. तर, पालिकेची आर्थिक स्थिती खराब असताना इतकी मोठी थकबाकी असणे योग्य नाही. ही थकबाकी वसूल झाली पाहिजे. एकीकडे ताज हॉटेलला रस्ते वापरण्याच्या शुल्कात सूट दिली जात असताना त्यांच्याकडे 35 कोटींची थकबाकी आहे. हे योग्य नाही. जी काही थकबाकी आहे ती त्वरित वसूल करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

टार्गेट नक्की पूर्ण करू -

महापालिकेची मालमत्ता कराची १५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्यातील किमान १० टक्के वसुली प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील आतापर्यंत सुमारे ७०० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. महापालिकेने नवीन बिले पाठवण्यापूर्वी जुन्या थकीत बिलांची रक्कम वसूल करण्यावर भर दिला होता. १ हजार ५०० कोटी रुपयांपैकी आतापर्यंत ७०० कोटी रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. महापालिकेने जे टार्गेट दिले आहे, ते आम्ही नक्कीच पूर्ण करू, अशी माहिती कर निर्धारण व संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगिता हसनाळे यांनी दिली.

मोठे थकबाकीदार -

एच पूर्व विभाग - फॉर्च्युन 2000 इमारती, 164 कोटी

ए विभागातील - ईश्वसय्या रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर 141 कोटी

म्हाडा मुंबई गोरेगाव रिजन 4 - 75 कोटी

एचडीआयएल - 55 कोटी

सेव्हन हिल रुग्णालय - 51 कोटी

एमएमआरडीए - 49 कोटी

सुमेर असोसिएट्स - 37 कोटी

जवाला रियल इस्टेस्ट - 47 कोटी

रूणवाल प्रोजेक्ट्स - 29 कोटी

शिवकृपा - 35 कोटी

रघुवंशी मिल - 24 कोटी

म्हाडा - सुमारे 150 कोटी रुपये

एसआरए - 23 कोटी

हॉटेल ताज लँड अँड वांद्रे - 35 कोटी रुपये

बिच रिसॉर्ट - 22 कोटी रुपये

बॉम्बे क्रिकेट असोसिएशन - 34 कोटी रुपये

वरळी वल्लभभाई स्टेडियम - 28 कोटी रुपये

मुंबई विमानतळ - 25 कोटी रुपये

रेडियस अँड डिझर्व्ह बिल्डर - 28.42 कोटी

तुलसानी - 28.43 कोटी

विमल असोसिट्स - 22.36 कोटी

वैदेही आकाश हौसिंग - 19.53 कोटी

शिवस्वामी कृपा - 35 कोटी

हलकारा - 23.89 कोटी

ओमकार - 23.11 कोटी

बी.जी.शिर्के टेक्नॉलॉजी - 19.98 कोटी

संजय कन्स्ट्रक्शन - 18.42 कोटी

हेही वाचा- महाराष्ट्रात मागील ११ महिन्यात २२७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मदत मिळाली फक्त ३४८ जणांना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.