ETV Bharat / state

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई; १८ कोटींचा दंड केला वसूल - मुंबई कोरोना बातम्या

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ९ लाख २५ हजार बेशिस्त मुंबईकर विनामास्क फिरताना आढळून आले आहे. त्यांच्याकडून पालिकेने १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल केला आहे.

municipal corporation take action against unmasked walkers in mumbai
विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई; १८ कोटींचा दंड केला वसूल
author img

By

Published : Jan 1, 2021, 7:28 PM IST

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक आहे. नागरिकांनी मास्क लावावे म्हणून पालिका, आरोग्य विभाग वेळोवेळी आवाहन करत आहे. त्यानंतरही मुंबईकर त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ९ लाख २५ हजार बेशिस्त मुंबईकर विनामास्क फिरताना आढळून आले आहे. त्यांच्याकडून पालिकेने १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल केला आहे.

प्रसार रोखण्यासाठी मास्क -

कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, हात धुणे, गर्दी टाळण्याचे निर्देश आहेत. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत या नियमांना फाटा दिला जात आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. संबंधितांवर कारवाईसाठी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार २४ प्रभागातील गर्दीच्या ठिकाणांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच प्रत्येक वॉर्डातील मनपा कर्मचारी-अधिकारी आणि क्लिन-अप मार्शल या संस्थेमार्फत कारवाई सुरु आहे. तरीही विनामास्क फिरण्यांची संख्या वाढते आहे. गुरुवारी सुमारे १३ हजार १७९ मुंबईकर विनामास्क आढळले. त्यांच्याकडून २६ लाख ३५ हजार ८०० रुपयांचा दंड एकाच दिवशी आकारल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

वर्षभरात ९ लाख मुंबईकर विनामास्क फिरले -

मास्क लावणे बंधनकारक असताना नोव्हेंबरमध्ये ४ लाख ८५ हजार ७३७ लोक विनामास्क फिरताना आढळून आले. कारवाईनंतर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल, असा प्रशासनाचा दावा होता. परंतु, उलट यात वाढ झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत ९ लाख २५ हजार ५७२ लोक विनामास्क आढळली आहेत. त्यांच्याकडून पालिकेने सुमारे १८ कोटी ८७ लाख ४८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.

दादर, परळ भागात सर्वाधिक कारवाई -

दादर, परळ, माटुंगा, शिवडी, वडाळा, माहिम या भागांत सर्वाधिक १ लाख ६९ हजार ४७० लोक विनामास्क फिरताना आढळून आले. त्या खालोखाल अंधेरी, गोरेगाव आणि मालाड भागात १ लाख ४२ हजार ५८५ मुंबईकर विनामास्क फिरताना आढळले. कुलाबा, फोर्ट, चर्चगेट, गिरगाव, ग्रॅण्टरोड आणि मुंबई सेंट्रल भागात १ लाख ३१ हजार, तर खार, सांताक्रुज, अँधेरी, भांडूप, घाटकोपर, मुलुंड, दहिसर, बोरीवली आणि कांदिवली भागात १ लाख २२० हजार मुंबईकर आढळले आहेत. गोवंडी, मानखूर्द आणि कुर्ला परिसरात सर्वाधित कमी १ लाख ६ हजार सर्वाधिक लोक आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - बाटली अन् बारबालांच्या नादाला लागून व्यापारी बनला सराईत घरफोड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.