मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 979 नवे रुग्ण आढळून आले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 28 हजार 550 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 035 वर पोहोचला आहे.
मुंबईमधून शुक्रवारी 907 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 1 हजार 861 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 354 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 84 दिवसांवर पोहोचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे शुक्रवारी मुंबईत 47 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून शुक्रवारी 907 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 1 हजार 861 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 28 हजार 550 रुग्ण असून 1 लाख 1 हजार 861 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 035 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 354 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 84 दिवस तर सरासरी दर 0.83 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 605 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 454 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 6 लाख 37 हजार 867 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.