आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद : तापमानात वाढ होत असल्याने नागरीक उकाड्याने हैराण होत आहेत. नोकरीवरुन घरी आल्यानंतर अनेकांना अंघोळ करु वाटत असते. परंतु शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात होत असल्याने मुंबईकर अधिकच हैराण होत आहेत. दरम्यान जलअभियंता विभागाकडून शहरातील पाणी पुरवठ्याविषयी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. शहराच्या मुख्य भागातील पाणीपुरवठा आज म्हणजे शनिवारी आणि उद्या रविवारी बंद केला जाणार आहे.
पाणीपुरवठा का बंद करण्यात आला? : 27 मे 2023 शनिवार ते 28 मे 2023, रविवार या दिवासंमध्ये शनिवारी म्हणजेच आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. मध्य मुंबईत हा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. का बंद करण्यात आला आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हो,ना काही हरकत नाही. त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. शहरातील जलवाहिनी कुठे फुटली आहे, कुठे पाणी गळती होत आहे का, हे शोधण्यासाठी शहरातील या भागात पाणीपुरवठा या दिवशी बंद करण्यात आला आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. जर समजा एखाद्या ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असेल त्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्ती केलेचे काम केले जाईल. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
या वेळात नाही होणार पाणीपुरवठा : शहरातील कोणत्या भागात कोणत्यावेळी पाणी पुरवठा होणार नाही हे जाणून घेऊ. शनिवारी संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेमध्ये गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, कापड बाजार या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर रविवारी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत धोबी घाट, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, या भागात पाणीपुरवठा होणार नाही.
हेही वाचा -
Mumbai Water Reduction : पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल, प्रशासकांनी तोडगा काढावा - रवी राजा
'मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार'