ETV Bharat / state

मुंबईतील तरुणाची फोर्ब्सकडून दखल, घरपोच सुविधेसाठी बनविले 'डेली निन्जा' अॅप - needs

मूळचा ठाण्याच असणारा सागर यरनाळकर याने हे अॅप बनविले आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने त्यानं दूधवाल्यांचे नेटवर्क तयार केले आहे. दूधवाल्यांचे नेटवर्क वापरून त्याने घरपोच किराणा, फळे आणि भाजीपाला मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डेलि निंजा हे अॅप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरु, मैसूर, चेन्नई आणि हैद्राबाद या सहा शहरांमध्ये सुरू आहे.

निन्जा अॅपचे प्रणेते सागर येरनाळकर आणि त्याचा मित्र अनुराग गुप्ता
author img

By

Published : Mar 26, 2019, 9:52 AM IST

मुंबई - आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आपल्याला घरपोच मिळाव्यात अशी आपली इच्छा असते. ही गरज ओळखून मुंबईच्या सागर यरनाळकर या तरुणाने एका अॅपची निर्मीती केली आहे. ज्या अॅपच्या माध्यमातून रोज लागणाऱ्या वस्तू आपल्या घरापर्यंत येऊ शकतात. या अॅपचे नाव आहे, डेली निन्जा अॅप. विशेष म्हणजे या शोधासाठी सागरची दखल थेट फोर्ब्सने घेतली आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात घरगुती सामान, किराणा माल, भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जाणे अवघड असते. बाहेर जाण्यासाठी अतिरिक्त वेळ काढावा लागतो. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही गोष्ट थकवणारी असते. अशा परिस्थितीत दैनंदिन गरजेच्या वस्तू घरपोच मिळाव्यात अशी आपली अपेक्षा असते. हीच अपेक्षा ओळखून सागर यरनाळकर याने या अॅपची निर्मीती केली आहे. हे अॅप्लीकेशन घेतले तर तुमचा दुधवाला तुम्हाला सामान घरपोच आणून देऊ शकतो.

काय आहे डेली निन्जा अॅप
मूळचा ठाण्याच असणारा सागर यरनाळकर याने हे अॅप बनविले आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने त्यानं दूधवाल्यांचे नेटवर्क तयार केले आहे. दूधवाल्यांचे नेटवर्क वापरून त्याने घरपोच किराणा, फळे आणि भाजीपाला मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डेलि निंजा हे अॅप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरु, मैसूर, चेन्नई आणि हैद्राबाद या सहा शहरांमध्ये सुरू आहे. या सहा शहरांमध्ये २ हजार ४०० दुधवाले कार्यरत आहेत. या सहा शहरांमधील दुधवाल्यांचं नेटवर्क सांभाळण्यासाठी ४०० हून अधिक जणांची टीम काम करते. जवळपास ७० हजार घरांमध्ये डेलि निंजाद्वारे सामान पोहोचवण्याचे काम होत आहे.

सागर आणि त्याचा मित्र अनुराग गुप्ता यांनी एकत्र येत हा व्यवसाय सुरू केला. सागर आणि अनुराग हे दोघे या व्यवसायात पार्टनर आहेत. सागरने इंजिनयरिंगची पदवी घेतली आहे. पण इंजिनयरिंगची नोकरी न करता त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या यादीत त्याच्या नावाची दखल घेण्यात आली आहे.

'डेली निंजा' कसं काम करतं?
सुरुवातीला तुम्हाला डेलि निंजा हे अॅप डाऊनलोड करायचे आहे. या अॅपच्या मदतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी लागणारा किराणा, भाजी-फळे ऑर्डर करायची आहेत. तुम्ही अगदी रात्री ११ वाजेपर्यंत देखील या अॅपच्या मदतीने दुसऱ्या दिवशी लागणारे घरगुती सामान मागवू शकता. तुम्ही दिलेली ऑर्डर दुसऱ्या दिवशी सकाळी दुधवाल्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. अंदाजे सकाळी ७ वाजेपर्यंत ऑर्डर केलेले सर्व सामान तुम्हाला मिळेल. ज्याप्रमाणे तुम्ही महिन्याला किराणावाल्याचे बिल चुकते करता तसंच तुम्हाला इथं करायचे आहे.

कशी सुचली संकल्पना
अनुराग आणि सागर हे दोघे जॉबसाठी बंगळुरुला राहत होते. त्यांच्यासोबत आणखी दोन रुम पार्टनर्स राहत होते. त्यांच्यातल्याच एकामुळे त्यांना ही संकल्पना सुचली. ते राहणाऱ्या अपार्टमेंटमधल्या दुधवाल्याशी त्याच्या मित्राची चांगली ओळख झाली होती. रोज रात्री तो त्याला व्हॉट्स अॅप करायचा. व्हॉट्स अॅप करून दुसऱ्या दिवशी आवश्यक सामान, जसे की अंडी, ब्रेड आणायला सांगायचा. दुधवाला सकाळी ७ वाजता अपार्टमेंटमधल्या घरांमध्ये दुध पोहोचवायचा. त्याचवेळी तो सागरच्या रुम पार्टनरने मागवलेले सामान देखील पोहोचवायचा. त्यातूनच सागर आणि अनुरागला ही संकल्पना सुचली.

फोर्ब्सकडून सन्मान

फोर्ब्सच्या यादीत नावे येणे हे जगभरातील लोकांसाठी अतिशय मानाची बाब आहे. सागरची देखील फोर्ब्सच्या यादीत दखल घेण्यात आली आहे. अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत सागर झळकला आहे. संकल्पना आवडल्याचं फोर्ब्सकडून फोनवरून सागरला कळवण्यात आले. जवळपास ४० ते ५० स्पर्धकांमधून सागर आणि त्याच्या टिमची निवड करण्यात आली.

Intro:मराठमोळ्या तरुणांच्या संकल्पनेची फॉर्ब्सकडून दखल

दुधवाल्याच्या मदतीनं घरगुती सामान तुमच्या दारीठाण्यात राहणाऱ्या एका मराठमोळ्या तरूणानं दैनंदिन जीवनात उपयुक्त अशी शक्कल लढवत 'डेली निंजा' या अनोख्या अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याच्या या संकल्पनेची दखल फोर्ब्सकडून देखील घेण्यात आली आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात घरगुती सामान, किराणा माल किंवा भाजीपाला आणणं सर्वांनाच शक्य नसतं. जॉब करणाऱ्या महिला, बॅचलर्स तरूण-तरूणी किंवा ज्येष्ठ नागरिक असो प्रत्येकवेळी बाहेर जाऊन घरगुती आवश्यक अशा वस्तू आणणं शक्य नसतं. पण समजा तुम्हाला आवश्यक अशा सर्व वस्तू दुधवाल्यानं आणून दिल्या तर? दुधवाला कसं आणून देईल आणि का? असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. पण ठाण्यात राहणाऱ्या एका मराठमोळ्या तरूणानं हे शक्य करून दाखवलं आहे. दैनंदिन जीवनात उपयुक्त अशी शक्कल लढवत त्यानं डेली निंजा या अनोख्या अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. आता या अॅल्पिकेशनचा आणि दुधवाल्याचा काय संबंध? असा आणखी एक प्रश्न तुम्हाला पडला असेल. अरे थांबा थांबा. मिळणार... मिळणार... तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार.

अॅप्लिकेशन आहे तरी काय?

ठाणेकर सागर यरनाळकर या तरूणानं डेलि निंजा (Daily Ninja) या अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीनं त्यानं दूधवाल्यांचं प्रस्थापित नेटवर्क तयार केलं आहे. दूधवाल्यांचं प्रस्थापित नेटवर्क वापरून त्यानं घरपोच किराणा, फळे आणि भाजीपाला मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डेलि निंजा हे अॅप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरु, मैसूर, चेन्नई आणि हैद्राबाद या सहा शहरांमध्ये सुरू आहे. या सहा शहरांमध्ये २ हजार ४०० दुधवाले कार्यरत आहेत. या सहा शहरांमधील दुधवाल्यांचं नेटवर्क सांभाळण्यासाठी ४०० हून अधिक जणांची टिम काम करते. जवळपास ७० हजार घरांमध्ये डेलि निंजाद्वारे सामान पोहोचवण्याचं काम होतं.

सागर आणि त्याचा मित्र अनुराग गुप्ता यांनी एकत्र येत हा व्यवसाय सुरू केला. सागर आणि अनुराग हे दोघं या व्यवसायात पार्टनर आहेत. सागरनं इंजिनयरिंगची पदवी घेतली आहे. पण इंजिनयरिंगची नोकरी न करता त्यानं स्वत:चा व्यवसाय सुरू केला. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या यादीत त्याच्या नावाची दखल घेण्यात आली आहे.

'डेली निंजा' कसं काम करतं?

सुरुवातीला तुम्हाला डेलि निंजा हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. या अॅपच्या मदतीनं तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी लागणारा किराणा, भाजी-फळं ऑर्डर करायची आहेत. तुम्ही अगदी रात्री ११ वाजेपर्यंत देखील या अॅपच्या मदतीनं दुसऱ्या दिवशी लागणारं घरगुती सामान मागवू शकता. तुम्ही दिलेली ऑर्डर दुसऱ्या दिवशी सकाळी दुधवाल्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंच पोहोचवण्यात येईल. अंदाजे सकाळी ७ वाजेपर्यंत ऑर्डर केलेलं सर्व सामान तुम्हाला मिळेल. ज्याप्रमाणे तुम्ही महिन्याला किराणावाल्याचे बिल चुकते करता तसंच तुम्हाला इथं करायचं आहे.

अनुराग आणि सागर हे दोघं जॉबसाठी बंगळुरुला राहत होते. त्यांच्यासोबत आणखी दोन रुम पार्टनर्स राहत होते. त्यांच्यातल्याच एकामुळे त्यांना ही संकल्पना सुचली. ते राहणाऱ्या अपार्टमेंटमधल्या दुधवाल्याशी त्याच्या मित्राची चांगली ओळख झाली होती. रोज रात्री तो त्याला व्हॉट्स अॅप करायचा. व्हॉट्स अॅप करून दुसऱ्या दिवशी आवश्यक सामान जसं की अंडी, ब्रेड असं आणायला सांगायचा. दुधवाला सकाळी ७ वाजता अपार्टमेंटमधल्या घरांमध्ये दुध पोहोचवायचा. त्याचवेळी तो सागरच्या रुम पार्टनरनं मागवलेलं सामान देखील पोहोचवायचा. तुकडूनच सागर आणि अनुरागला ही संकल्पना सुचली.

२०१७ मध्ये आम्ही बंगळुरुत पहिल्यांदा ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. चांगल्या प्रतिसाद मिळत असल्यानं इतर शहरांमध्ये त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला आम्हीच घरोघरी जाऊन सामान पोहोचवायचो. तेव्हा दुधवाल्यांशी कुठलाच करार झाला नव्हता. पण एक महिन्यातच आम्हाला कळालं की, दुधवाल्यांच्या मदतीशिवाय घरोघरी जाऊन सामान पोहोचवणं कठीण आहे. त्यामुळे अखेर दुधवाल्यांशी करार केला.

- सागर यरनाळकर, संस्थापक, डेलि निंजा

फोर्ब्सकडून सन्मान

फोर्ब्सच्या यादीत नावं येणं हे जगभरातील लोकांसाठी अतिशय मानाची बाब आहे. सागरची देखील फोर्ब्सच्या यादीत दखल घेण्यात आली आहे. अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत सागर झळकला आहे. संकल्पना आवडल्याचं फोर्ब्सकडून फोनवरून सागरला कळवण्यात आलं. जवळपास ४० ते ५० स्पर्धकांमधून सागर आणि त्याच्या टिमची निवड करण्यात आली.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.