ETV Bharat / state

Mumbai News: महिलांच्या माणुसकीचे अनोखे उदाहरण; पोलीस भरतीसाठी आलेल्या 265 तरुणांना दिले मोफत जेवण - youths who came for police recruitment

मुंबईकर महिलांच्या माणुसकीचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना मोफत जेवण घातले आहे. मागील गेल्या 18 दिवसांपासून श्रीकृष्ण नगरमधील 17 महिला एकत्र येऊन जवळपास 265 मुलांना नियमित जेवण खाऊ घालत आहेत.

Mumbai News
मुंबईकर महिलांच्या माणुसकीचे अनोखे उदाहरण
author img

By

Published : Mar 27, 2023, 6:46 AM IST

मुंबईकर महिलांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना घातले मोफत जेवण

मुंबई : मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या निमित्ताने राज्यभरातून अनेक तरूण येत असतात. त्यांचा जेवणाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो. मुंबई पश्चिम उपनगरातील सांताक्रुज येथील वाकोला परिसरात असलेल्या श्रीकृष्ण नगर येथे राहणाऱ्या महिलांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांना मायेचा घास खाऊ घातला आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या आणि रिकाम्या पोटी रस्त्यावर झोपणाऱ्या या युवकांबाबात श्रीकृष्ण नगरमधील महिलांच्या मनात मायेची ऊब निर्माण झाली. त्यांनी आपल्या हाताने बनवलेला मायेचा घास खाऊ घालण्याचा पवित्रा हाती घेतला.

पोलीस भरती सुरू : खाकी वर्दी घालून देशसेवा करायची, हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्याचाच एक भाग म्हणजे मैदानी चाचणी होय. सध्या मुंबईमध्ये पोलीस भरती सुरू आहे. या भरतीसाठी येणारे बहुतेक तरुण हे ग्रामीण भागातील आहेत. बहुतांश मुलांना पडलेली आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना चारशे रुपयात मिळणारे जेवण खिशाला झेपत नसल्याने उपाशीपोटीच रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे.

उपाशीपोटी झोपावे लागत : मुंबईत आलेला माणूस कधीच उपाशी राहत नाही, याचा अनुभव मुंबईत पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या युवकांना आली आहे. मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर, धुळे, यवतमाळ, अकोला, वर्धा अशा अनेक ग्रामीण भागातून युवक मुंबईत दाखल झाले. मात्र, त्यांना पोलीस भरतीच्या ठिकाणी देण्यात येणारे चारशे रुपयांत जेवण परवडत नसल्याने उपाशीपोटी झोपावे लागत होते. त्यांची झालेली ही स्थिती वाकोला परिसरात असलेल्या श्रीकृष्ण नगरमधील सुधाकर ठाकूर यांच्या निदर्शनास पडली. वाकोला येथे असलेल्या श्रीकृष्ण नगर परिसरात श्रीकृष्ण मंदिर आहे. पोलीस भरतीसाठी आलेले तरुण मंडळी विश्रांतीसाठी येतात. त्यांची भेट ठाकूर यांच्याशी झाली आणि तिथेच त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न संपला.

रात्रीच्या जेवणाचा प्रश्न : भरतीसाठी आल्यानंतर कुठे राहायचे? हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. त्यामुळे यापैकी अनेक तरुण शहरातील फुटपाथवर झोपलेले आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे या सर्व तरुणांना रात्रीच्या जेवणाचा प्रश्न भेडसावत आहे. याची दखल श्रीकृष्ण नगर मंडळ आणि या मंडळातील महिलांनी घेतली. 9 मार्चपासून या महिला एकत्र येऊन जेवण बनवून रात्री सात-साडेसात वाजताच्या सुमारास पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना जेवण खाऊ घालत आहेत. जवळपास 265 पोलीस भरतीसाठी आलेले तरुण दररोज या जेवणाचा लाभ घेत आहेत.

यांनी हातभार लावला : या महिलांच्या सामाजिक कार्यासाठी अनेक मदतीचे हात लाभले आहेत. कोणी शिधा दिला तर कोणी जेवणासाठी लागणारे साहित्य दिले. या सामाजिक कार्यात सुधाकर ठाकूर, संतोष संतोष वायंगणकर, सुरेश सुगावा, राज यादव, सचिन गुरव दर्शन कुळये, उमेश मोरे, शशिकांत ढोले, गणेश शिगवण, अभिजीत पाटील, विजय पाटील, मयुर घुमाव, परेश शेट्टी, श्याम म्हात्रे, संतोष म्हात्रे, तुषार गुरव, दिलिप कुळये यांनी हातभार लावला आहे.

गरजू तरुणांना जेवण : तसेच शिवा चैवतकर, सुरेखा धुमाळ, ममता शितल गुरव, मिना दुरूपकर, शोभा सुर्यवंशी, स्वप्राली सटये, मीना बजे, सुनाना गोरे, विनिता हरयाण, तृप्ती चव्हाण, सुजाता गुरव, रचना कटाळे, रुबी, जयश्री येळे, किर्ती म्हात्रे, रत्ना गौडा, कांचन घाग, रेणुका हरयाण, शलाका सटये, जयश्री सटये, दिपिका वायंगणकर, प्रगती गायकर, सारीका धाडगे, पुष्पा शिर्के, जयश्री इंगवले, कल्पना निलंगरेआणि श्रावणी सटये या महिला एकत्र येऊन जेवण बनवून पोलीस भरतीसाठी आलेल्या गरजू तरुणांना जेवण खाऊ घालून माणुसकी जपत आहेत.

हेही वाचा : CM Eknath Shinde Met Raj Thackeray : मुख्यमंत्री 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.