मुंबई: मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ही लाट आता ओसरत आहे. रुग्णसंख्या ३०० पर्यंत आली आहे. आता फक्त मुंबईत एकच इमारत सील आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल. यामुळे रुग्णसंख्या अशीच कमी राहिली तर फ्रेबुवारीच्या शेवटी मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल असे महापौरांनी सांगितले. विरोधकांकडून आरोप केले जात आहेत मात्र जे काही अनलॉक झाले ते सर्व मुंबईकरासाठी केले असेही महापौर म्हणाल्या. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झाली असली तरी केंद्र आणि राज्य सरकार मास्क घाला सांगत आहे. मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन महापौरांनी केले.
महाराष्ट्रातून मजुरांचे हाल झाले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर बोलताना, त्यांच्या वक्तव्यावर बोलणार नाही. चीनमधून कोरोना आला आणि सर्व ठप्प झाले. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची काळजी घेतली. भाजप आणि काँग्रेसच्या वादात पडणार नाही. राज्यात रेल्वे केंद्र सरकार चालवते. ज्या मजूरांना राज्याबाहेर जायचे होते तेव्हा त्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्रातून मजुरांचे जास्त हाल झाले नाहीत, पण त्यांच्या राज्यात जाताना त्रास झाला हे समोर आले होते याची आठवण महापौरांनी करून दिली.
भाजपने राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाची मागणी केली जातेय. त्यावर लता दिदींची उंची कोणीही मोजू नका. त्या खूप मोठ्या होत्या. त्यांचे स्मारक झाले पाहिजे. केवळ मुंबई, महाराष्ट्रात नाही तर जगभरात स्मारकं व्हायला हवीत. मात्र, भाजपने या मुद्द्यावरुन वितुष्ट निर्माण करून, वादविवाद करुन राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये. भाजप याबाबत छुपे राजकारण करत आहे. भाजपने ते थांबवावे असे आवाहन ही महापौरांनी केले. लतादीदींवरुन वाद घालणारा तथाकथित आमदार आहे त्याला कळले पाहीजे की एवढ्या मोठ्या दुर्मिळ रत्नाला अश्या घाणेरड्या राजकारणासाठी वापरले जातेय याची खंत महापौरांनी व्यक्त केली.
फडणविसांनी मदत केली
फडणविसांनी मला मुंबईत लतादीदींच्या अंत्यदर्शनाला येण्यास मदत केली. त्याचे राजकारण करण्याची गरज नाही. आमच्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हेच सांगतेय. इथे महिलांचा आदर केला जातो. फडणविस साहेबांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला मदत केली असेही त्या म्हणाल्या .
Mayor On Mumbai Unlock : मुंबई लवकरच पूर्णपणे अनलॉक, लता दिदींचा वापर राजकारणासाठी नको - महापौर पेडणेकर
मुंबईमधील रुग्णसंख्या घटली (The number of patients in Mumbai has decreased) आहे. पुढील आठवड्यापर्यंत लसीकरण १०० टक्के पूर्ण होईल (Vaccination will be 100 percent complete). यामुळे फ्रेबुवारीच्या शेवटी मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. भारतरत्न लता मंगेशकर यांची उंची मोठी आहे. त्यांचा वापर घाणेरड्या राजकारणासाठी करू नये असा टोला ही महापौरांनी भाजपाला लगावला आहे.