मुंबई - जूनच्या अखेरीपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या १२ ते १३ दिवसात ५० टक्के म्हणजेच अर्धी धरणे भरली आहेत.(Monsoon Update Mumbai) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये ५०.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
अर्धी धरणे भरली - मुंबईत २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. मगंळवारी सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ५०.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने १२ जुलैला ७ लाख २८ हजार २८६ दशलक्ष लिटर ५०.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला. २९ जून ते १२ जुलै या दरम्यान ४०.१६ टक्के म्हणजेच ५,८१,२८० दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली. सध्या धरणात १८९ दिवसांचा पाणी साठा आहे. मुंबईला ७ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा जून महिन्यात समाधान कारक पाऊस पडलेला नाही. यामुळे २७ जून रोजी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती, ८ जुलैला धरणात २५ टक्के पाणी साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामधील ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या १० टक्के पाणी कपात असल्याने ३४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे.
पाणीसाठा
साल | टक्के |
२०२० | २२.४६ |
२०२१ | १७.४३ |
२०२२ | ५०.३२ |
धरणातील पाणीसाठा -
धरणाचे नाव | पाणीसाठा |
अप्पर वैतरणा | ८६,९३० दशलक्ष लिटर |
मोडक सागर | १,१३,१८१ दशलक्ष लिटर |
तानसा | ८४,५५० दशलक्ष लिटर |
मध्य वैतरणा | ९१,४५७ दशलक्ष लिटर |
भातसा | ३,३२,५२६ दशलक्ष लिटर |
विहार | १३,९५१ दशलक्ष लिटर |
तुलसी | ५,६९१ दशलक्ष लिटर |
हेही वाचा : Maharashtra monsoon 2022 : राज्यात मान्सून सक्रिय, 5 दिवसांसाठी मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा