मुंबई - गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने मुंबईत थैमान घातले होते. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून सलग कोसळत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांचे हाल सुरू केले आहेत.
मुंबईत सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. पूर्व उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मात्र या पावसाच्या पाण्यामुळे असल्फा मेट्रो स्टेशनच्या खालच्या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
असल्फा मेट्रो स्टेशन जवळ नेहमीच पाणी तुंबते आणि त्यामुळे आजू-बाजूच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. या तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतूक देखील मंदावल्याचे पाहायला मिळत आहे, तर इथे नेहमीच पाणी तुंबत असले तरी अजूनही ठोस उपाय यावर करण्यात आलेला नाही.