मुंबई : परीक्षा देऊन सुद्धा विधी विषयाच्या परीक्षेतील अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील घोळ पुन्हा एकदा समोर आलेला आहे. तर विद्यापीठाने याबाबत खुलासा केला आहे की अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचा क्रमांक नोंदवला आणि बारकोड चुकीचा टाकल्यामुळे हा प्रकार झाला आहे.
परीक्षा झाल्यावर पुन्हा नवा गोंधळ : मुंबई विद्यापीठाशी संबंधित विविध महाविद्यालयांमध्ये पाचव्या सत्राची परीक्षा नुकतीच पार पडली. ही परीक्षा पार पडण्याच्या आधीच याबाबत विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड मिळणे, परीक्षेला बसणे या प्रक्रियेमध्ये देखील गोंधळ झाला होता. त्यानंतर परीक्षा झाली. आता परीक्षा झाल्यावर पुन्हा नवा गोंधळ समोर आलेला आहे.
चार विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवले : विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, मुंबई विद्यापीठाच्या पाचव्या सत्राची परीक्षा दोन महिन्यापूर्वी पार पडली. मात्र अनेक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर दाखवले गेले. त्यामुळे ही बाब विद्यापीठाकडून झाली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. विद्यापीठाकडून एका महाविद्यालयासाठी सुमारे 25 विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयासाठी चार विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवले आहे. असे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा दावा विद्यार्थी यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. की, जर परीक्षा दिलेली आहे, तिथे हजर होते तरी गैरहजेरी कशी काय येऊ शकते? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
परीक्षा देऊनही गैरहजर? : स्वाभाविक आहे जेव्हा परीक्षेला विद्यार्थी हजर होते असा त्यांचा दावा आहे आणि तो दावा विद्यापीठ नाकारत नाही याचा अर्थ प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका त्या गेल्या कुठे? कारण विद्यार्थ्यांचे त्या उत्तर पत्रिकेवर परीक्षा क्रमांक असतात प्रश्नपत्रिका क्रमांक देखील असतो केंद्राचे देखील नाव त्यामध्ये असते. हजेरीपटावर देखील या सर्व बाबी नोंद केलेले असतात. तसेच याचा बारकोड क्रमांक देखील असतो. मात्र ही सर्व माहिती जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांनाच परीक्षा केंद्रावर फेराव्या मारावा लागत असल्याची देखील बाद सूत्रांकडून समजते.
विद्यापीठाचा खुलासा : याबाबत महाराष्ट्र स्टुडंट युनियन विद्यार्थी संघटनेच्या वतीने या घोळला जबाबदार विद्यापीठाला ठरवलेले आहे. विकास शिंदे यांनी म्हटले विधी विषयाची पाचव्या सत्राची परीक्षा झाली. त्यामध्ये अनेक विद्यार्थी हजर असून गैरहजर दाखवले गेले हे विद्यार्थ्यांचा नुकसान आहे. तर, विद्यापीठाच्या वतीने यासंदर्भात म्हटलेले आहे की, विद्यार्थ्यांनी चुकीचा क्रमांक टाकल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक विद्यापीठाकडे प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची सोय देखील विद्यापीठाकडून लवकरच सुरू करण्यात येईल अशा खुलासा विद्यापीठाने केला आहे.